पेठ : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था व खासगी संस्थेतील सर्व व्यवस्थापनाच्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संघटनांच्या आॅनड्यूटी अधिवेशनाला महाराष्ट्र शासनाच्या शालेय व क्रीडा विभागाने ब्रेक लावला असून, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्याच्या दृष्टीने जिल्हा व राज्यस्तरीय अधिवेशन दीर्घ सुटीच्या कालावधीत आयोजित करण्याच्या सूचना केल्या आहेत.राज्यात विविध व्यवस्थापनाच्या प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक, महाविद्यालये व अध्यापक विद्यालयातील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या संघटना कार्यरत असून, दर तीन वर्षांनी संघटना पातळीवर अधिवेशन घेण्यात येते. यामध्ये सहभाग घेण्यासाठी शासनाकडे विशेष नैमित्तिक रजेची मागणी करण्यात येत असते. यामुळे शैक्षणिक कामकाजावर परिणाम होऊन शाळा ओस पडत असतात. याबाबत पालक, शिक्षणतज्ज्ञ व प्रसारमाध्यमांकडून मोठ्या प्रमाणावर टीका-टिप्पणीही केली जाते.अशा आहेत शासनाच्या सूचनासदर संघटना शासनमान्यता प्राप्त असावी. अधिवेशन हे फक्त अशैक्षणिक (दीर्घ सुट्टीमध्ये) कालावधीमध्येच घेण्यात यावे,अधिवेशन आयोजित करण्यासाठी संबंधित शिक्षण संचालक (प्राथमिक शिक्षण संचालनालय / माध्यमिक व उच्च माध्यमिकशिक्षण संचालनालय) यांची पूर्व परवानगी घ्यावी, शैक्षणिक कामकाज सुरु असताना अधिवेशनास परवानगी दिल्याने सदर अधिवेशनाला शिक्षक मोठ्या प्रमाणावर हजर राहिल्यास सदर कालावधीत शाळा बंद राहिल्यास विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होते.यास्तव दीर्घ सुट्टी व्यतिरिक्त इतर कालावधीत सदर अधिवेशन आयोजन करण्यासाठी परवानगी देण्यात येऊ नये. तसेच असे प्रस्ताव शासनमान्यतेकरितादेखील सादर करू नयेत. शासन स्तरावर असे प्रस्ताव सादर केल्यास त्यांचा विचार केला जाणार नाही.शिक्षक संघटनांकडून आयोजित केलेले अधिवेशन, शिक्षण परिषद अथवा चर्चासत्र हा सुध्दा एक शैक्षणिक उपक्र म आहे. शिक्षण क्षेत्रातील शिक्षणतज्ञांना निमंत्रित करून शिक्षकांचे उद्बोधन केले जाते. राज्य शासनातील विविध खात्यांचे मंत्री व सचिव शिक्षकांना या माध्यमातून मार्गदर्शन करत असतात. त्यामूळे संघटनांच्या अधिवेशनासाठी आॅन ड्यूटी रजा मिळावी.-अंबादास वाजे, राज्य कार्याध्यक्षमहाराष्ट्र राज्य प्राथ. शिक्षक संघ
शिक्षक संघटनांच्या आॅनड्यूटी अधिवेशनाला ब्रेक !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2020 9:44 PM
पेठ : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था व खासगी संस्थेतील सर्व व्यवस्थापनाच्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संघटनांच्या आॅनड्यूटी अधिवेशनाला महाराष्ट्र ...
ठळक मुद्देशासन निर्णय : दीर्घ सुटीच्या कालावधीत अधिवेशन घेण्याच्या सूचना