मनमाड : संपूर्ण भारतामध्ये ५ सप्टेंबर हा दिवस शिक्षणतज्ज्ञ, माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. यानिमित्ताने मनमाड येथील कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयामध्ये सोशल डिस्टन्सिंगचे पालन करत डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन करून शिक्षक दिन साजरा करण्यात आला.यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. एस. जगदाळे यांनी मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांची काही दुर्मिळ भाषणं दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून दाखवण्यात आली. उपप्राचार्य डॉ. प्रमोद आंबेकर यांनी प्रास्ताविक केले. यावेळी प्रा. एन . ए. पाटील यांनी गुगल फॉर्मच्या माध्यमातून प्रश्नावली तयार करु न डॉ. राधाकृष्णन यांचे विचार विद्यार्थ्यांपर्यंत पोहचविले.
मनमाड महाविद्यालयात शिक्षक दिन साजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 06, 2020 6:33 PM
मनमाड : संपूर्ण भारतामध्ये ५ सप्टेंबर हा दिवस शिक्षणतज्ज्ञ, माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. यानिमित्ताने मनमाड येथील कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयामध्ये सोशल डिस्टन्सिंगचे पालन करत डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन करून शिक्षक दिन साजरा करण्यात आला.
ठळक मुद्दे डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांची काही दुर्मिळ भाषणं दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून दाखवण्यात आली.