नशिक : राज्यातील उच्च माध्यमिक शाळांना २० टक्के अनुदान मंजूर करून अनुदान निधी त्वरित वितरित करण्यासाठी शासन निर्णय निर्गमित करुन शिक्षकांच्या खात्यावर पगार जमा करण्यात यावे या मागणीसाठी प्रा. कर्तार सिंग ठाकूर व प्रा. अनिल परदेशी यांच्या नेतृत्वात काढण्यात आलेली पायी दिंडी शनिवारी (दि.३) स्थगित करण्यात आली आहे.महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक शाळा कृती संघटनेच्या मध्यामतून शिक्षकांनी बुधवारी (दि.३०) २० टक्के अनुदान मंजूरअसलेल्या शाळांना तत्काळ निधी निर्गमित करुन शिक्षकांच्या खात्यावर पगार जमा करण्याच्या मागणीसाठी येवल्यातून आमदार किशोर दराडे यांच्या कार्यालयात निवेदन सुरू केलेली पायी दिंडी तीन दिवसानंतर संगमनेर येथे पोहोचल्यानंतर स्थगित केली. . महसूल मंत्री तथा कृती समिती अध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी शिक्षकांच्या आंदोलनाची दखल घेत कृती समितीचा अहवाल मंत्रिमंडळासमोर सकारात्मक अहवाल सादर केल्याची माहिती देतानाच आमदार सुधीर तांबे यांनी शिक्षकांचे शिष्ट मंडळ आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांची भेट घडवून देण्याचे आश्वासन दिल्यानंतर शिक्षकांनी पायी दिंडीचे आंदोलन तूर्तास स्थगिती केल्याची माहिती नाशिक जिल्हा मुख्याध्यापक संघाचे सचिव एस बी देशमुख यांनी दिली.
शिक्षकांची पायी दिंडी स्थगित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 03, 2020 11:58 PM
नशिक : राज्यातील उच्च माध्यमिक शाळांना २० टक्के अनुदान मंजूर करून अनुदान निधी त्वरित वितरित करण्यासाठी शासन निर्णय निर्गमित करुन शिक्षकांच्या खात्यावर पगार जमा करण्यात यावे या मागणीसाठी प्रा. कर्तार सिंग ठाकूर व प्रा. अनिल परदेशी यांच्या नेतृत्वात काढण्यात आलेली पायी दिंडी शनिवारी (दि.३) स्थगित करण्यात आली आहे.
ठळक मुद्देपायी दिंडी तीन दिवसानंतर संगमनेर येथे पोहोचल्यानंतर स्थगित