नाशिक : प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी आयोजित शिक्षक दरबारात शिक्षण विभागाचे अधिकारी आणि शिक्षक आमदार किशोर दराडे यांच्यासमोर नाशिक जिल्ह्यातील शाळांच्या मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेबर कर्मचाऱ्यांनी प्रत्यक्षात हजर राहून त्यांच्या विविध समस्या व प्रश्नांचा लेखी व तोडी स्वरूपात पाढा वाचला.
नाशिकरोड येथील के जे मेहता हायस्कूलच्या शोभेंदू सभागृहात मंगळवारी (दि.९) नाशिक विभागाचे शिक्षण उपसंचालक नितीन उपासनी, माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ.वैशाली झनकर- वीर, प्राथमिक शिक्षणाधिकारी राजीव म्हस्कर, उपशिक्षणाधिकारी अनिल शहारे आदींच्या उपस्थितीत शिक्षण दरबार घेण्यात आला. यावेळी शिक्षकांनी रखडलेले वरिष्ठ व निवड श्रेणी प्रस्ताव, प्रलंबित डी.एड. ते बी.एड वेतन श्रेणी, विनाअनुदानित, अंशतः अनुदानित कर्मचाऱ्यांना शंभर टक्के अनुदानित बदलीस मान्यतेच्या प्रश्नांसह शैक्षणिक पात्रतेनुसार संवर्ग बदलाचे प्रस्ताव मार्गी लावणे, सर्व शाळांची सेवा सेवाज्येष्ठता यादी अद्ययावत करण्याचे आदेश देणे, दप्तर दिरंगाई दूर करण्यासोबतच विशेष शिक्षक अपंग, गतिमंद विद्यार्थ्यांना शिकवणारे शिक्षकांचे समायोजन त्वरित करण्याची मागणीही शिक्षकांनी यावेळी केली. मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी शिक्षक दरबारामध्ये त्यांच्या व्यथा मांडचानाच त्या सोडविण्यासाठी अधिकाऱ्यांनी लवकर निर्णय घेऊन कर्मचाऱ्यांचे समाधान सूचना यावेळी करण्यात आल्या. संभाजी पवार ,संजय चव्हाण, मोहन चकोर ,एस के सावंत, एस बी देशमुख, मधुकर वाघ, प्रदीप सांगळे, बाळासाहेब ढोबळे, राजेंद्र सावंत, रोहित गांगुर्डे ,दिनेश अहिरे ,सीपी कुशारे, संजय गीते ,योगेश पाटील, अशोक कदम ,दिगंबर नारायणे ,भाऊसाहेब शिरसाठ, दीपक याळीस ,कलीम अन्सारी इत्यादींनी चर्चेत भाग घेऊन शिक्षकांचे प्रश्न मांडले.
शिक्षणांच्या मागण्या
-अनुकंपा तत्त्वावरील मान्यता द्यावी
- पात्र शिक्षकांना शालार्थ आय.डी. द्यावेत
- सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या लाभाच्या योजना (पेन्शन) त्वरित मार्गी लावाव्यात
-मेडिकल बिल रजा रोखीकरण,फरक बिल तत्काळ मिळावेत
पी.एफ स्लिपा व पे युनिटच्या समस्या मार्गी लावाव्यात
-संच मान्यता दुरुस्ती करावी
वेतनेत्तर अनुदान देणे
---
शिक्षकांनी मांडल्या समस्या
माध्यमिक शिक्षण अधिकारी कार्यालयामध्ये सेवाज्येष्ठता बाबत गेल्या ऑगस्ट महिन्यापासून अन्याय दूर करण्यासाठी दाद मागण्यात आली. परंतु वेळोवेळी सुनावणी घेऊनही आज पर्यंत माध्यमिक शिक्षण अधिकारी कार्यालयाने सुनावणीचे निर्णय कळवला नसल्याची तक्रार चांदवड तालुक्यातील पाथरी येथील माध्यमिक शिक्ष तानाजी कदम यांनी माडली
---
इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये शिक्षकांची नियुक्ती करताना योग्य शैक्षणिक पात्रता शिक्षण विभागाकडून मान्यता तसेच घेतली जाणारी फी याबाबत शिक्षण विभागाचे लक्ष ठेवून त्यावर नियंत्रण ठेवण्याची मागणी मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष राजेंद्र सावंत यांनी केली.
--
सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना डी.एड वेतन श्रेणी ते बी.एड वेतनश्रेणीच्या मान्यता तसेच विनाअनुदानित शाळेवरून अनुदानित शाळेत बदलीच्या मान्यता तात्काळ देण्याची मागणी नाशिक शहर माध्यमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष मोहन चकोर यांनी केली.
--
===Photopath===
090221\09nsk_39_09022021_13.jpg
===Caption===
शिक्षण दरबारात शिक्षकांच्या समस्या मांडताना नाशिक शहर माध्यमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष मोहन चकोर. व्यासपीठावर आमदार किशोर जराडे यांच्यासह नितीन उपासणी, डॉ. वैशाली झनकर, राजीव म्हसकर, अनिल शहारे आदी