: कोरोना काळात विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा खेळखंडोबा झाल्याचा आरोप पालकस्तरावरून होत असला तरी याच कठीण काळात उपक्रमशील शिक्षकांनी नवनवीन उपक्रम राबवत आनंददायी शिक्षणाचा पाया कृतियुक्त शिक्षणातून उभा केला. जिल्ह्यातील अनेक शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या शिक्षणात खंड पडू न देता डिजिटल यंत्रणेचा आधार घेत वर्षभर चालवलेली शाळा काैतुकास्पद ठरली आहे.
काळातल्या शिक्षणाचे मूल्यमापन हा अत्यंत क्लिष्ट विषय असताना, मोबाईलच्या चार इंची स्क्रीनवर व्हॉट्सॲपच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिक्षण द्यावे लागले. या कठीण काळात विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहातून दूर जाऊ नये, म्हणून शिक्षकांनी अनेक शैक्षणिक प्रयोग तसेच उपक्रम राबविले.
मोबाईलवरून शिकविण्याच्या मर्यादा सोबतच, ग्रामीण भागात मोबाईलच्या अडचणी म्हणजे रेंज नसणे, ॲण्ड्राईड मोबाईल नसणे यांनाही सामोरे जावे लागले. शिक्षकांनी व्हिडिओ कॉल, झूम, गुगल मीट अशी माध्यमे वापरून पाहिली. मात्र, वारंवार संवाद खंडित होण्याच्या अनुभवाने हे माध्यम फारसे प्रभावी ठरले नाही. दररोजच्या शिक्षणात खंड पडू नये म्हणून वस्तीवरील मोठ्या वर्गातील विद्यार्थ्यांना विषयमित्र आणि विद्यार्थीमित्र म्हणून नेमून खालच्या वर्गातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची सोय करण्यात आली. जिथे या दोन्ही गोष्टी शक्य झाल्या नाहीत. त्याठिकाणी गल्ली शाळा भरवून शिक्षकांनी समक्ष शिकवले.
कोरोना संपण्याची प्रतीक्षा असतानाच दुसरी लाट आली. तिसरी संभाव्य लाट लहान मुलांना धोकादायक असल्याच्या बातम्यांमुळे ऑफलाईन शाळा सुरु करण्याच्या उत्साहात असलेल्या शिक्षकांच्या उत्साहावर पुन्हा पाणी फेरण्याची वेळ आली. मे महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात ‘स्वाध्याय’ परत येत असून, शैक्षणिक वर्ष २०२० - २१ मध्ये विद्यार्थ्यांचे अध्ययन किती प्रमाणात झाले आहे. या अनुषंगाने १५ मे ते ५ जून २०२१ दरम्यान पायाभूत क्षमता व त्या त्या इयत्तेचे महत्त्वाचे ‘शिक्षण परिणाम’ यावर आधारित परीक्षा होणार आहेत. त्यावरून कोरोना काळातल्या शिक्षणावर प्रकाशझोत पडणार आहे.
इन्फो
ज्ञानदानासह अन्य उपक्रमातही सहभाग
शिक्षकांनी शिक्षकांसाठी तयार केलेल्या वाहिनीच्या माध्यमातून ऑनलाईन तसेच ऑफलाईन अध्ययन सुरूच ठेवले आहे. याशिवाय जिल्हा सीमा चेक पोस्टवर कर्तव्य बजावले, कोविड रुग्णांचे सर्वेक्षण, गाव सर्वेक्षण, इत्यादी अनेक कामे केली. या काळात ४० ते ४५ शिक्षक कोरोनाग्रस्त झाले. त्यातून बरे होऊन पुन्हा आपल्या कामासाठी हजरही झाले. काही खासगी शिक्षकांचा मृत्यू झाला. अशा कठीण काळातही शिक्षकांनी आपले ज्ञानदानाचे कार्य सुरुच ठेवले.
फोटो- १८ कोरोना टीचिंग१/२/३
===Photopath===
180521\18nsk_4_18052021_13.jpg
===Caption===
फोटो- १८ कोरोना टीचिंग१/२/३