सिन्नर : ‘झिरो एनर्जी’ म्हणून नावारूपास आलेल्या पुणे जिल्ह्यातील वाबळेवाडी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेस जिल्ह्यातील सिन्नर, मालेगाव, लासलगाव, इगतपुरी, निफाड, त्र्यंबकेश्वर, बागलाण तालुक्यातील गुरुजनांनी भेट देऊन विविध उपक्रमांबद्दल अधिक माहिती जाणून घेतली.नाशिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी एस. भुवनेश्वरी, शिक्षणाधिकारी डॉ. वैशाली झनकर यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक जिल्ह्यातील एकूण ९७ शिक्षकांची टीम अभ्यास दौऱ्यावर गेली होती. या अभ्यासदौºयात शैक्षणिक गुणवत्ता, विकासासाठी सुरू असलेल्या उपक्रमांची माहिती, शालेय कामकाज व जबाबदारी वाटप, लोकसहभाग व त्यातून केलेला शाळेचा विकास, विद्यार्थ्यांच्या सर्र्वागीण व कौशल्य विकासासाठी सुरू असलेले उपक्रम, अध्ययन अध्यापनाच्या नवीन तंत्राचा अभ्यास, विषयनिहाय अध्ययन पद्धती व उपक्रम, विद्यार्थ्यांसाठी आव्हाने उपलब्धी यांचा अभ्यास करण्यात आला.दत्तात्रय वारे यांच्या संकल्पनेतून वाबळेवाडी शाळा साकारली. त्यांच्यासह खैरे गुरुजी व टीम कार्यरत आहे. २०१२ ला ३२ पट असलेली शाळा आज ६०० पटसंख्यापर्यंत पोहोचली आहे. स्वीडन देशाशी टायअप करण्यासाठी गावातील धार्मिक सप्ताह, विवाह सोहळे, यात्रा, सार्वजनिक उत्सव बंद करून सदर निधी शाळेसाठी वापरतात. इलेक्ट्रिक कार, ईव्हीएम मशीन, रोबोट, सी प्लस कोड अशा नानाविध वस्तू विद्यार्थ्यांनी स्वत: बनविल्या आहेत. काही विद्यार्थ्यांचे स्वत:चे यू-ट्यूब चॅनल आहे. इयत्ता नववीत असलेले सानिया शेख व आदित्य वाबळे यांचे अनुक्र मे इंग्रजी व गणित या विषयावर प्रभुत्व असून, त्यांनी दहावीचा अभ्यासक्रम पूर्ण केला आहे.शाळा बदलण्याचा निर्धारया टीममध्ये सिन्नर तालुक्यातील जिजा धिंदळे, दत्तू नवाळे, रमेश धिंदळे, सुनीता चौधरी, विजय कोळी, वसंत गोसावी, वैशाली सायाळेकर, आत्माराम शिंदे, बाळासाहेब सोनवणे, सीमा लहामगे, सुभाष शिंदे, सचिन वाकचौरे हे शिक्षक सहभागी झाले होते. वाबळेवाडी शाळेतून अफाट ऊर्जा घेऊन आपली शाळा बदलण्याचा निर्धार करुनच हे सर्व गुरुजन नाशिकमध्ये परतले आहेत. हा अभ्यासदौरा यशस्वी करण्यासाठी गजानन उदार व शरद तोत्रे यांनी विशेष परिश्रम घेतले.झिरो एनर्जी शाळा निर्मितीचा संकल्पविज्ञान प्रयोग शाळा, संगीत कक्ष, वाचनालय, वायफाय यंत्रणा, स्लीपिंग क्लास रूम, पाणी फिल्टर प्रकल्प, वैशिष्ट्यपूर्ण क्रीडांगण, बगीचा, खेळाचे साहित्य, इमारत आंतरबाह्य रचना, शाळा समिती, अंगणवाडीचे ग्रुप व प्रशिक्षित शिक्षक, छोटा सायंटिस्ट ‘वेदांत वाबळे’ याची आविष्कार लॅब, जीवन कौशल्य शिक्षण अशा अनेक बाबी वैशिष्ट्यपूर्ण आहेत. या दौºयातून जिल्ह्यातही गुणवत्तापूर्ण आंतरराष्ट्रीय विचार, झिरोे एनर्जी शाळा आम्हीही निर्माण करू असा विश्वास भेट देणाºया टीमने व्यक्त केला.
शिक्षकांनी जाणून घेतले अध्यापनाचे नवीन तंत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 05, 2020 11:42 PM
‘झिरो एनर्जी’ म्हणून नावारूपास आलेल्या पुणे जिल्ह्यातील वाबळेवाडी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेस जिल्ह्यातील सिन्नर, मालेगाव, लासलगाव, इगतपुरी, निफाड, त्र्यंबकेश्वर, बागलाण तालुक्यातील गुरुजनांनी भेट देऊन विविध उपक्रमांबद्दल अधिक माहिती जाणून घेतली.
ठळक मुद्देआधुनिक तंत्रज्ञानाशी सांगड : वाबळेवाडीतील शाळेतील उपक्रम