दिवाळी सणापूर्वी शिक्षकांचा पगार खात्यावर जमा होणे अपेक्षित होते; मात्र मालेगाव पंचायत समिती शिक्षण विभाग व महाराष्टÑ बँकेच्या भोंगळ कारभारामुळे तालुक्यातील शिक्षकांचीदिवाळी साजरी झाली नाही. प्रशासनाचा निष्काळजीपणा यास कारणीभूत असल्याने सर्व शिक्षक संघटना कृती समितीने मालेगाव पंचायत समिती प्रवेशद्वारावर निषेध नोंदविला तसेच दारावर काळा आकाश कंदिल लावत निषेध केला. सुट्टीनिमित्त अधिकारी उपलब्ध नसल्याने भिंतीला निवेदन चिकटविण्यात आले. याप्रसंगी विविध शिक्षक संघटनेचे तालुकाध्यक्ष सुभाष वाघ, भाऊसाहेब पवार, शरद ठाकूर, सुनील ठाकरे, तालुका सरचिटणीस भाऊसाहेब सोनवणे, सुधाकर पवार, विजय पिंगळे, जिल्हा पदाधिकारी अनिल जगताप, कैलास पगार, किशोर सोंजे, विजय अहिरे, राज्य पदाधिकारी भरत शेलार, रमेश चव्हाण, वाल्मिक घरटे, विष्णू गुमाडे, पी. के. बच्छाव आदिंसह पदाधिकारी व शिक्षक उपस्थित होते.
मालेगाव तालुक्यातील शिक्षकांची दिवाळी अंधारात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2018 5:41 PM