सायखेडा : शिक्षक दिनाचे औचित्य साधून राज्यातील प्राथमिक शिक्षकांनी जुनी पेन्शन योजना लागू करावी यासाठी कालबद्ध आंदोलनास प्रारंभ केला असून, निफाड तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक, माध्यमिक शिक्षक, आश्रमशाळेतील शिक्षकांनी गुरुवारी दिवसभर काळ्या फिती लावून कामकाज करत शासनाचा निषेध नोंदवला.१ नोव्हेंबर २००५ पासून राज्यातील सर्व कर्मचाऱ्यांची शासनाने जुनी पेन्शन बंद करून नवीन अंशदायी पेन्शन योजना सुरू केली आहे; मात्र सदर योजना अत्यंत कुचकामी असून, या योजनेत कर्मचाऱ्यांच्या हिताचा कोणताही निर्णय नसल्याने सदर योजना बंद करण्यात यावी, अशी मागणी अनेक वर्षे राज्यातील कर्मचारी करत आहेत.या योजनेच्या विरोधात जुनी पेन्शन हक्क संघटना स्थापन करण्यात आली आहे संघटनेच्या माध्यमातून अनेक आंदोलने छेडण्यात आली आहेत. विधानसभेवर मोर्चा, बेमुदत उपोषण, अर्धनग्न आंदोलन, आक्र ोश मोर्चा असे आंदोलने करूनदेखील कोणताही निर्णय शासनस्तरावर घेतला जात नसल्याने ५ सप्टेंबरच्या शिक्षक दिनाचे औचित्य साधून प्रत्येक कर्मचाºयाने काळ्या फिती लावून निषेध व्यक्त केला, तर ९ सप्टेंबर रोजी एकदिवसीय संप पुकारण्यात आला आहे. त्यानंतर कोणताही निर्णय घेतला नाही तर ११ सप्टेंबर रोजी बेमुदत संप पुकारण्यात येणार आहे. या योजनेत कर्मचारीसंख्या शिक्षक असली तरी इतर ३५ संघटनांनी या आंदोलनात सहभाग घेतला आहे. जवळपास ८०० कर्मचाºयांनी शिक्षक दिनाचे औचित्य साधून काळ्या फिती लावून आंदोलन केले.शिक्षक दिनाच्या पवित्र दिवशी शिक्षकांवर काळ्या फिती लावून कामकाज करण्याची वेळ येते. यापेक्षा दुर्दैव काय असेल, अंशदायी पेन्शन योजना बंद करून जुनी पेन्शन योजना लागू होत नाही तोपर्यंत हा लढा सुरूच राहणार आहे.- भास्कर खेलूकर, शिक्षक
शिक्षकांचे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 05, 2019 11:58 PM
सायखेडा : शिक्षक दिनाचे औचित्य साधून राज्यातील प्राथमिक शिक्षकांनी जुनी पेन्शन योजना लागू करावी यासाठी कालबद्ध आंदोलनास प्रारंभ केला असून, निफाड तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक, माध्यमिक शिक्षक, आश्रमशाळेतील शिक्षकांनी गुरुवारी दिवसभर काळ्या फिती लावून कामकाज करत शासनाचा निषेध नोंदवला.
ठळक मुद्देनिफाड : जुनी पेन्शन योजना लागू करण्याची मागणी करत निषेध