येवला : राज्यात बी.एल.ओ च्या अतिरिक्त कामांचा भार जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षकांच्या खांद्यावर बळजबरीने लादला जात असून याबाबत उच्च न्यायालयाने शिक्षकांना बी.एल.ओच्या कामातून वगळण्याचे आदेश देऊनही त्याचे पालन होत नाही. शिक्षकांना बी.एल.ओ च्या अतिरिक्त कामांतून मुक्त कराव, या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य आदर्श शिक्षक समितीच्यावतीने नायब तहसिलदार राजेंद्र राऊत यांना निवेदन देण्यात आले.निवेदनात म्हटले आहे, येवला तालुक्यातील बहुतांश जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षकांवर मतदार याद्यांच्या कामाचा अतिरिक्त बोजा दिला आहे. तालुक्यातील बहुतेक शाळेत चार वर्गांना दोन शिक्षक शिकवण्यास दिले असून यातील एका शिक्षकाला बी.एल.ओ ची कामे बघताना तारांबळ उडत असते. उर्वरित शिक्षकाला चार वर्ग सांभाळून शाळेची जिल्हा गुणवत्ता, समृद्धी कार्यक्र म, प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र सारखी अनेक कामे आॅनलाइन प्रणालीवर वेळेत भरावी लागत असल्याने त्याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या शैक्षणकि गुणवत्तेवर होऊ शकतो. त्यामुळे शिक्षकांना या कामातून वगळावे अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी आदर्श शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष राजू सानप, उपाध्यक्ष भगवान कांगणे, रघुवीर चव्हाण, भांडगे, विजय खैरनार, प्रकाश कांगणे आदी उपस्थित होते.
बीएलओच्या अतिरिक्त कामांना शिक्षकांचा विरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 01, 2019 6:38 PM
मुक्ततेची मागणी : शिक्षक समितीचे निवेदन
ठळक मुद्देतालुक्यातील बहुतेक शाळेत चार वर्गांना दोन शिक्षक शिकवण्यास दिले असून यातील एका शिक्षकाला बी.एल.ओ ची कामे बघताना तारांबळ उडत असते