नाशिक : शिक्षकांनी वेतन तत्काळ करावे, या मागणीसाठी जिल्हा बॅँकेत निदर्शने तसेच कार्यकारी संचालकांच्या दालनात ठिय्या आंदोलन केले. शिक्षकांचे वेतन पुढील आठवड्यात केले जातील, असे आश्वासन नरेंद्र दराडे यांनी दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. याबाबत बॅँकेची कार्यवाही सुरू असल्याचे आश्वासन शिरसाठ यांनी दिले. याच दरम्यान, अध्यक्ष नरेंद्र दराडे बॅँकेत दाखल झाले. त्यावेळी शिक्षकांनी आपला मोर्चा अध्यक्षांच्या दालनाकडे वळविला. यावेळी संघटनेच्या वतीने आपले गाऱ्हाणे शिक्षकांनी मांडले. अध्यक्ष दराडे यांनी बॅँक अडचणीत असल्याचे सांगितले. पैसा उपलब्ध करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहे. पुढील आठवड्यापर्यंत बॅँकेची परिस्थिती पूर्वपदावर येईल. शिक्षकांचे वेतन बॅँकेतून काढता येईल, असे दराडे यांनी सांगितले. या ठिय्या आंदोेलनात मुख्याध्यापक संघाचे के. के. अहिरे, राज्य शिक्षक संघटनेचे साहेबराव कुटे, एस. बी. शिरसाठ, बी. के. सानप, डी. यू. अहिरे, बाळासाहेब सोनवणे, संग्राम करंजकर, संजय पाटील, किशोर जाधव, आर. डी. निकम, एस. व्ही. बच्छाव, के. डी. बाळखेडकर, एस. एस. मुळे, ए. एम. बच्छाव, टी. बैरागी, सी. बी. पवार, दिनेश अहिरे, फिरोज बदशाह, मु. एस. भाबड, एस. बी. भाबड, व्ही. पी. कांगणे, व्ही. एस. धात्रक, नीलेश ठाकूर आदि शिक्षक सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)पायऱ्यांवर निदर्शने माध्यामिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे वेतन बॅँकेतून होत नसल्याने आक्र मक शिक्षक व कर्मचाऱ्यांनी बॅँकेच्या पायऱ्यांवर निदर्शने केली. यानंतर कार्यकारी संचालक यशवंत शिरसाठ यांची भेट घेत, आपल्या मागणीसाठी शिक्षकांनी दालनातच ठिय्या दिला. त्यात मोठ्या संख्येने शिक्षक सहभागी झाले होते.
वेतनासाठी शिक्षकांचा ठिय्या
By admin | Published: April 14, 2017 12:35 AM