नाशिक : शासकीय, निमशासकीय अधिकारी कर्मचाऱ्याप्रमाणे राज्यातील प्राथमिक शिक्षकांना ही रजारोखीकरणाचा लाभ देण्यात यावा, अशी मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघातर्फे करण्यात आली आहे. राज्याचे ग्रामीण विकास मंत्री हसन मुश्रीफ व शालेय शिक्षण व क्रीडामंत्री वर्षा गायकवाड यांना महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या नाशिक शाखेतर्फे निवेदन देण्यात आल्याची माही नाशिक जिल्हा कार्यकारणीच्या पदाधिकाऱ्यांनी दिली आहे. शासकीय कर्मचाऱ्याना व शिक्षकाना वषार्तील दहा दिवस अर्जीत रजेचा लाभ मिळतो. याथील शासकीय कर्मचाऱ्यांना रजा वापरल्या नाहीतर तीन वर्षांनी शिल्लक रजेतून तीस दिवस रजेच्या रोखीकरणाचा फायदा घेता येतो. मात्र शिक्षकांना अशाप्रकारे रजांचे रोखीकरण करून फायदा मिळत नाही. त्यामुळे शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणेच शिक्षकांनाही रजांचे रोखीकरण करण्याची तरतुद उपलब्ध करून देणाची मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक संघाने केली आहे. राज्यात सर्व शिक्षा अभियानअतंर्गत शाळा डिजिटल बनल्या असून इंटरनेटने जोडल्या गेल्या आहेत. त्यामुळे शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी चालना मिळाली आहे. त्यावर परिणाम होऊ नये म्हणून शिक्षक फारसे रजा घेत नसल्याचा दावा करतानाच सेवा निवृत्तीच्या अनेक शिक्षकांच्या संपुष्टात येतात. त्यामुळे शिक्षकांनाही रजा रोखीकरणाचा लाभ मिळण्यासाठी तरतुद करण्याची मागणी मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने करण्यात आल्याची माहीती नाशिक जिल्हाध्यक्ष सुभाष अहिरे, सरचिटणीस अशोक ठाकरे यांनी दिली आहे.
रजा रोखीकरणाच्या मागणीसाठी शिक्षककांचे शालेय शिक्षण मंत्र्यांना साकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 03, 2020 2:58 PM
शासकीय कर्मचाऱ्याना व शिक्षकाना वषार्तील दहा दिवस अर्जीत रजेचा लाभ मिळतो. याथील शासकीय कर्मचाऱ्यांना रजा वापरल्या नाहीतर तीन वर्षांनी शिल्लक रजेतून तीस दिवस रजेच्या रोखीकरणाचा फायदा घेता येतो. मात्र शिक्षकांना अशाप्रकारे रजांचे रोखीकरण करून फायदा मिळत नाही. त्यामुळे शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणेच शिक्षकांनाही रजांचे रोखीकरण करण्याची तरतुद उपलब्ध करून देणाची मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक संघाने केली आहे
ठळक मुद्देशिक्षकांना मिळावा रजा रोखीकरणाचा लाभ महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाची मागणी ग्रामीण विकासमंत्री, शालेय शिक्षणमंत्री यांना निवेदन