सिन्नर : शिक्षण ही निरंतर प्रक्रिया आहे. शिक्षकांनी नवनवीन तंत्रज्ञान वापरून ज्ञानरचनावादानुसार कृतीयुक्त अध्यापन करावे. शिक्षकांनी वैज्ञानिक दृष्टिकोन अंगी बाळगावा, असे प्रतिपादन भारतीय प्रशासन सेवेतील सेवानिवृत्त अधिकारी भालचंद्र वाघ यांनी केले.लायन्स क्लब आॅफ सिन्नर सिटीच्या वतीने आयोजित आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. व्यासपीठावर लायन्स झोन चेअरमन तथा मविप्रचे संचालक हेमंत वाजे, माजी संचालक कृष्णाजी भगत, खजिनदार रमेश जगताप, अध्यक्ष डॉ. डी.एम. गडाख, सचिव संजय सानप, किरण मोरे आदिंसह पुरस्कारार्थी उपस्थित होते. लायन्स क्लबचे अध्यक्ष डॉ. दत्तात्रय गडाख यांनी प्रास्ताविक केले. राजेंद्र कपोते यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. डॉ. विजय लोहारकर व डॉ. सुजाता लोहारकर यांनी सूत्रसंचालन केले. सचिव सानप यांनी आभार मानले. याप्रसंगी माजी नगराध्यक्ष अश्विनी देशमुख, तेजस्विनी वाजे, सुरेश कट्यारे, जितेंद्र जगताप, महेंद्र तारगे, नगरसेवक गोविंद लोखंडे, घन:श्याम देशमुख, डॉ. भरत गारे, डॉ. विष्णू अत्रे, त्र्यंबक खालकर, अॅड. भास्कर गिते, अॅड. राजेंद्र चव्हाणके, सेवानिवृत्त मुख्याध्यापक प्रभाकर गंगावणे, गो.स. व्यवहारे, आर. जे. थोरात, मनीष गुजराथी, मु.शं. गोळेसर, संगीता कट्यारे, उज्ज्वला खालकर, डॉ.प्रशांत गाडे, आनंदा कांदळकर, पांडुरंग वारुंगसे, एस. बी. देशमुख आदिंसह लायन्स क्लबचे सदस्य उपस्थित होते. राष्टÑगीताने समारोप करण्यात आला.
शिक्षकांनी वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगावा भालचंद्र वाघ : लायन्स क्लबकडून आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 07, 2017 11:47 PM