लोकमत न्यूज नेटवर्कमेशी : सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमी राज्यभर शाळा बंद आहेत, मात्र शाळा बंद शिक्षण चालू याअंतर्गत विविध शाळेतील कर्मचारी विविध माध्यमातून विद्यार्थ्यांना शिक्षण देत आहेत. याचप्रकारे दहिवड येथील जिजामाता माध्यमिक विद्यालयाच्या शिक्षकांनी‘शिक्षक आपल्या दारी’हा उपक्र म राबविला आहे. त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.या विद्यालयात इयत्ता पाचवी चे दहावीचे वर्ग असून तीनशेच्या आसपास शाळेचा पट आहे. विद्यालयात आर्थिकदृष्टया मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांची संख्याही बऱ्याच प्रमाणात आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे शाळा सुरू होणे अवघडच आहे. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांचे शिक्षणहोवूयाकरीता मुख्याध्यापक सुनिल शिंदे यांनी वेगवेगळे उपक्र म राबवून विद्यार्थ्यांना शाळेच्या प्रवाहात टिकवून ठेवले आहे. शिक्षकांनी विद्यार्थ्यांचा इयत्तानिहाय व्हाट्सअप ग्रुप तयार केले आहेत. यावर शिक्षकांनी आपल्या विषयांचे व्हिडिओ पाठवणे, नंतर स्वत: विषय शिक्षकांनी व्हिडिओ तयार करून विद्यार्थ्यांना पाठविणे तसेच या गोष्टींचा विद्यार्थी कितपत लाभ घेत आहेत हे शोधण्यासाठी आम्ही शिक्षक विद्यार्थ्यांच्या दारी ही अभिनव संकल्पना सर्वप्रथम जिल्ह्यात राबविली. त्याचे पालकांनी विद्यालयातील शिक्षकांचे कौतुक केले. या भेटीमध्ये शिक्षकांना अनेक उणविा जाणवल्या. बर्याच विद्यार्थ्यांकडे अँड्रॉइड मोबाईल नसणे, एकाच कुटुंबातील भाऊ-बहीण वेगळ्या वर्गात असणे. मोबाईल दिल्यावरही मुले मोबाईलमधील गेम खेळतात. या सर्व गोष्टींचा विचार करून झूम मिटींगचे नियोजन केले. या सर्व उपक्र मांना पालक व विद्यार्थ्यांनी भरभरून दाद दिली.
ग्रामीण भागात विद्यार्थ्यांसाठी शिक्षक आपल्या दारी उपक्र म
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2020 3:57 PM
मेशी : सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमी राज्यभर शाळा बंद आहेत, मात्र शाळा बंद शिक्षण चालू याअंतर्गत विविध शाळेतील कर्मचारी विविध माध्यमातून विद्यार्थ्यांना शिक्षण देत आहेत. याचप्रकारे दहिवड येथील जिजामाता माध्यमिक विद्यालयाच्या शिक्षकांनी‘शिक्षक आपल्या दारी’हा उपक्र म राबविला आहे. त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
ठळक मुद्देदहिवड विद्यालय : पालकांकडून स्वागत