नाशिकरोड : राष्ट्रवादी डॉक्टर सेलतर्फे दहा डॉक्टरांचे पथक कोकणातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी रवाना झाले. पालकमंत्री छगन भुजबळ, शहराध्यक्ष रंजन ठाकरे, डॉक्टर सेलचे शहराध्यक्ष डॉ. अमोल वाजे, उपाध्यक्ष डॉ. तुषार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिकरोडराष्ट्रवादी काँग्रेस डॉक्टर सेल अध्यक्ष डॉ. युवराज मुठाळ, डॉ. चंद्रकांत शेवाळे, जिल्हाध्यक्ष डॉ. योगेश गोसावी, डॉ. गटकळ, डॉ. संदीप शिंदे, नितीन उगले आदींनी महाड येथे ब्लँकेट, कपडे तसेच आरोग्य सुविधांसोबत औषधे व जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले. महाड, चिपळूण, पोलादपूर आदी पूरग्रस्तांसाठी प्रदेशाध्यक्ष नरेंद्र काळे यांच्या नेतृत्वाखाली मदत दिली जात आहे.
दहा डॉक्टरांचे पथक कोकणात रवाना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2021 01:27 IST