खडकी : जमिनीची जलद मशागत करण्यासाठी पारंपारिक बैलजोडीच्या औताला फाटा देऊन ट्रॅक्टरद्वारे रोटाव्हेटर यंत्रानेच पसंती दिली जात आहे. १ हजार ४०० रुपये प्रतिहेक्टर दराने जमिनी कांदा पिकासाठी तयार केल्या जात आहे. मात्र शेतकऱ्यांच्या सध्या ५० रुपये किलो दराने कांदा विकत खाण्याची वेळ आल्याने पोशिंदाच याचक झाला आहे.शेतकरी आपल्या पारंपारिक शेती व्यवसायाबरोबरच पाळीव प्राण्याची जतन करतो बैल, गायी,म्हशी, शेळ्या मोठ्या आदि जनावराच्या माध्यमातून दुधासारखा दुय्यम व्यवसाय करतो. तसेच बैल जोडीला औताला जोडून जमिनीची मशागत करतात मात्र सद्यस्थितीत पावसाने उघडीप दिली नसल्याने जमिनी झटपट नागरणी, वखारणी करावी लागत आहे.बैलजोडी औताच्या माध्यमातुन तयार करण्यासाठी १५ ते २० दिवसांचा कालावधी लागणार आहे. मात्र जमिनीचा जसा वाफसा होत आहे. त्या सवडीने जमीन तयार करावीत लागत आहे. गहू, हरभºयाचा हंगाममध्ये पेरणीला सुरूवात करावी लागणार आहे. तसेच उन्हाळ व रांगडा कांद्याचीही लागवड करावी लागणार आहे. यामुळे यंत्राचाच वापर करावा लागत आहे. मात्र ओली जमीन तयार करण्यासाठी ट्रॅक्टर मालकांनी १४०० रुपये एकराने रोटाव्हेटरद्वारे जमीन करुन मिळत आहे.गत तीन वर्षाच्या दुष्काळामुळे २५ एकराचा शेतकरी स्वस्त धान्य दुकानावर रांगा लावून गहू धान्य घेत आहे. शेतकºयाकडे दोन वर्षाचा साठा होऊ शकतो त्यामुळे गव्हाच्या कणग्या खाली झाल्या आहे. लहान बालके बाजरीच्या भाकरींना कंटाळली आहेत. त्यात स्वस्त धान्य दुकानातील खिचली मात्र गृहिनींना चांगली साथ देत आहे. कारण सायंकाळच्या स्वयंपाकाची चिंता सतावते मात्र खिचडीमुळे हा ताण कमी झाल्याने अन्नसुरक्षा योजनेचा मोठा लाभ मिळत आहे. जो शेतकरी आपला कांदा बाजारात विक्रीला नेत असे तोच शेतकरी सद्यस्थितीत ५० रुपये कांदा विकत घेऊन खात आहे. मात्र नगरवासियांनाच महागाईची घड भरते. कांद्याचे दर वाढले की महागाईला पेव फुटते त्यामुळे कांदा बाजारावर त्वरित परिणाम होत आहे. कांद्याची साठवण संपल्यामुळे बाजारात कांद्याची टंचाई भासणार आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना महाग कांदा खरेदी करावा लागणार आहे.
मशागतीसाठी बैलजोडी औताला फाटा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2019 8:58 PM