घोटी : गुरु शिष्याचे एक पवित्र नाते असते या पवित्र नात्याला काळिमा फासणारी घटना घोटी शहरात घडली असून हिंदी विषय शिकविणाऱ्या शिक्षकाने आठवीत शिकणाऱ्या मुलींशी गेली आठ ते दहा दिवसांपासून शिकविण्याच्या बहाण्याने वर्गातच सलगी करीत विनयभंग केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. व्यथित मुलीने हा प्रकार आपल्या पालकांना सांगितल्यानंतर सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब धुमाळ यांनी पुढाकार घेऊन या शिक्षकाविरु द्ध घोटी पोलीस ठाण्यात तक्र ार दिली आहे. तर कातकरी संघटनेने या बाबत तहसीलदार अनिल पुरे यांना निवेदन दिले आहे.घोटीतील जनता विद्यालयात आठवी इयत्तेत शिकत असलेल्या एका मुलीला शाळेतील शिक्षक सानप हे शिकविण्याच्या बहाण्याने वर्गातच लगट करून सातत्याने विनयभंग करीत असल्याने हि मुलगी व्यथित झाली होती. मात्र शिक्षकाच्या दहशतीमुळे तिने कुठे वाच्यता केली नव्हती. मात्र प्रकारात वाढ होऊ लागल्याने अखेर याबाबतची कल्पना तिने आपल्या आई विडलांना दिली. याबाबत पालकांनी सदरच्या शिक्षकाची तक्र ार मुख्याध्यापकाकडे केली. मात्र मुख्याध्यापकाने या बाबीकडे दुर्लक्ष करून सदरच्या शिक्षकाला पाठीशी घालण्याची भूमिका निभावल्याने अखेर पालकांनी सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब धुमाळ यांच्याकडे व्यथा मांडली.दरम्यान याबाबत आज मुलीच्या पालकाने घोटी पोलीस ठाण्यात संबंधित शिक्षकाविरु द्ध विनयभंग आणि अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करावा अशा आशयाची तक्र ार केली असून कातकरी संघटनेने याच मागणीचे निवेदन इगतपुरी चे तहसीलदार अनिल पुरे याना दिले आहे. दरम्यान सदर शिक्षक गेल्या अनेक माहिन्यांपासून शालेय विद्यार्थिनीशी लगड करून विनय भंग करीत असल्याची माहिती समोर आली आहे. या मुलीप्रमाणे अनेक मुली त्यांच्या शिकार बनल्या आहेत. मात्र दहशती मुळे या मुली वाच्यता करीत नसल्याचे समजते.(वार्ताहर)
घोटीत शिक्षकाकडून विद्यार्थिनींची छेडछाड
By admin | Published: August 21, 2016 1:24 AM