येवला : तालुक्यातील धानोरा येथील मातोश्री तंत्रनिकेतन व फार्मसी महाविद्यालयात टेक्नोफेअर अंतर्गत विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.विद्यार्थ्यांनी महाविद्यालयीन जीवनात शिक्षणाबरोबरच व्यावसायिक दृष्टिकोन ठेवणे गरजेचे असून, त्यासाठी विविध स्पर्धांमध्ये भाग घेऊन ज्ञान मिळवावे. बदलत्या काळात नोकरीला प्राधान्य द्याच पण उद्योग उभारून प्रगती साधावी. नोकरीच्या शोधात फिरण्यापेक्षा नोकरी देणारे यशस्वी उद्योजक बना असा सल्ला नाशिक येथील उद्योजक दीपाली चांडक यांनी यावेळी दिला. याप्रसंगी नाशिक तंत्रशिक्षण कार्यालयाचे सहायक संचालक संजय पगारे, मातोश्री शिक्षण संस्थेचे संचालक रु पेश दराडे, प्राचार्य गीतेश गुजराथी, प्राचार्य रघुवेंद्र दुबे, पवन आव्हाड आदी व्यासपीठावर उपस्थित होते.विभागप्रमुख बाळासाहेब तांबे, सोमनाथ गाडे, यशवंत हिरे, संदीप कोल्हे, साईनाथ तडाखे यांच्या हस्ते पारितोषिक वितरित करण्यात आले. महेश गावंड, योगेश खैरनार, स्नेहल पाटील, वैभव धांडे, विलास गुजर, शेखर पवार, निखिल सदावर्ते, इराम सैद, ज्योती सोनवणे, काजल आंबेकर यांनी संयोजन केले. हेमंत गायकवाड व सायली पवार यांनी सूत्रसंचालन केले.असा आहे स्पर्धेचा निकाल :मायक्र ो प्रोजेक्ट : रोहित पगारे, अक्षय वाघ, शेजल जाधव.सी फायटर : सुनील चव्हाण, अभिजित चव्हाणके, आसिफ शेख.ब्रिज मेनिया : सुधीर बागल, अभिजित मिस्त्री, विश्वास अभंग.कॅड वार : रवींद्र लोखंडे, यश देशमुख, अभिषेक कालेकर.स्लो बाइक : प्रवीण महाले, रु पाली कुलकर्णी.टेक्निकल क्विज : ऋ षिकेश जाधव, दीपक चव्हाण, कार्तिक जाधव.पोस्टर प्रेझेंटेशन : मयुरी जगताप, मानसी गांगुर्डे, दिव्या पवार.
मातोश्री तंत्रनिकेतन-फार्मसी महाविद्यालयात टेक्नोफेअर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2020 10:40 PM