नाशिक : दंत वैद्यकीय क्षेत्रात नव्याने येऊ घातलेल्या बदलांचा आणि तंत्रज्ञानाचा सगळ्यांनाच उपयोग होऊ शकणार आहे. वैद्यकीय क्षेत्राला तंत्रज्ञानामुळे मोठा फायदा झाला असून, यामुळे बदललेल्या तंत्रज्ञानाचा शिक्षण क्षेत्रात उपयोग करून घ्यायला हवा, असे मत महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिलीप म्हैसेकर यांनी शुक्र वारी (दि. १३) महाराष्ट्र डेंटल असोसिएशनच्या राज्यस्तरीय अधिवेशनच्या उद्घाटनाप्रसंगी केले.यावेळी त्यांनी आरोग्य विज्ञान विद्यापीठामध्ये नवनवीन तंत्रज्ञानाचा नेहमीच वापर केला जातो असे सांगत विद्यापीठातील प्रत्येक विद्यार्थ्यांची प्रोफाइल आगामी वर्षात संकेतस्थळावर अपलोड होणार असल्याची माहिती दिली तसेच आरोग्य विज्ञान विद्यापीठाचा अभ्यासक्र म देशभरात स्वीकारला गेला आहे. तसेच त्यांनी या राज्यस्तरीय अधिवेशनाचे विशेष कौतुक करत या अधिवेशनात दंत वैद्यकीय क्षेत्रात नव्याने येऊ घातलेल्या बदलांचा आणि तंत्रज्ञानाचा सगळ्यांनाच उपयोग होऊ शकणार असल्याचे सांगितले.इंटरनेट, सोशल मीडिया, आधुनिक तंत्रज्ञान याबद्दल नकारात्मक चर्चा केली जात असली तरीही या अधिवेशनात मात्र याच तंत्रज्ञानाचा वैद्यकीय क्षेत्राला कसा फायदा होणार आहे. याबाबत प्रशंसा केली. विविध सांस्कृतिक कार्यक्र माच्या सादरीकरणाने या अधिवेशनाचे उद्घाटन झाल्यानंतर शनिवार (दि. १४) आणि रविवार (दि. १५) त्र्यंबकरोड येथील हॉटेल एमराल्ड पार्क येथे शैक्षणिक अधिवेशनाअंतर्गत विविध विषयांवरील चर्चासत्र आणि तज्ज्ञांचे मार्गदर्शन लाभणार आहे. याप्रसंगी डॉ. संजय भावसार, डॉ. सुरेश मेश्राम आदी उपस्थित होते. कार्यक्र माचे सूत्रसंचालन डॉ. प्रतिभा आहेर यांनी केले.
तंत्रज्ञानामुळे वैद्यकीय क्षेत्राला फायदा :म्हैसेकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2019 1:17 AM
दंत वैद्यकीय क्षेत्रात नव्याने येऊ घातलेल्या बदलांचा आणि तंत्रज्ञानाचा सगळ्यांनाच उपयोग होऊ शकणार आहे. वैद्यकीय क्षेत्राला तंत्रज्ञानामुळे मोठा फायदा झाला असून, यामुळे बदललेल्या तंत्रज्ञानाचा शिक्षण क्षेत्रात उपयोग करून घ्यायला हवा, असे मत महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिलीप म्हैसेकर यांनी शुक्र वारी (दि. १३) महाराष्ट्र डेंटल असोसिएशनच्या राज्यस्तरीय अधिवेशनच्या उद्घाटनाप्रसंगी केले.
ठळक मुद्देमहाराष्टÑ डेंटल असोसिएशनतर्फे राज्यस्तरीय अधिवेशन