नाशिक : विज्ञान व तंत्रज्ञानाने मानवी जीवन सुखकर केले आहे. घरातील वातीच्या दिव्यापासून एका क्लिकवर घरात पसरणारा लख्ख प्रकाशाचा प्रवास असो किंवा एका मागून एक मोट हाकून शेताचं सिंचन करण्यापासून शेकडो मैलावरून मोबाईलच्या रिंगने विद्युत पंप सुरू करण्यापर्यंतचा प्रवास हे सर्व विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रात कार्यरत नवसंशोधकांच्या नवनवीन कल्पनांमधूनच आकारास आले आहे. अशाचप्रकारे एका नवीन कल्पनेला प्रत्यक्षात आणण्याचा प्रयत्न करीत नाशिकमधील नवसंशोधक विद्यार्थ्यांनी एका व्यक्तीला दोनशे लीटरचे ड्रम सहज एका जागेवरून दुसऱ्या जागेवर हलविता येईल अशी ट्रॉली तयार करून आपल्यातील वैज्ञानिक दृष्टीकोनाचे दर्शन घडविले आहे.
शहरातील के. के. वाघ तंत्रनिकेतचे प्राचार्य यांनी सुचविलेल्या कल्पनेला नितीन वाटपाडे, शंकर पवार, संदीर आहेर यांच्यासह अभियांत्रिकी प्राध्यपकांनी व विद्यार्थांनी आकार मूर्त स्वरुप देत हे यंत्र विकसित केले आहे. यात औद्योगिक वसाहतीत काम करणाऱ्या कामगारांची कसरत कमी करण्याचा प्रयत्न करीत बॅरल कॅरीअर ट्रॉली विकसित करण्यात आली असून या ट्रॉलीमुळे दोनशे लीटर वजनाचा भरलेला ड्रम एकच व्यक्ती सहज हलवू शकतो अथवा प्रवेशद्वारापासून जनरेटर किंवा कारखान्यातील इंजिन अथवा यंत्रांपर्यंत सहज वाहून नेऊ शकतो. या ट्रॉलीच्या प्रात्यक्षिकातून विद्यार्थ्यांनी कामगारांचे ओझे हलके केल्याचे दिसून येते. त्याचप्रमाणे प्रत्येक घरात येणारा गॅस सिलिंडर स्वयंपाक घरापर्यंत नेण्यासाठी होणारी महिलांची कसरत लक्षात घेत या विद्यार्थ्यांनी सिलि़ंडर वाहून नेणारी ट्रॉलीही तयार केली आहे. या ट्रॉलीमुळे स्वयंपाकाचा सिलिंडर महिलांना अगदी सुटकेसप्रमाणे हलविणे शक्य होणार असून नवसंशोधकांनी केलेल्या या प्रयत्नांतून औद्योगिक वसाहतीतील कामगार असो किंवा स्वयंपाक घरात काम करणारी गृहिणी यांच्या कामाचे ओझे काही प्रमाणात का होईना हलके झाले आहे.
कोट-
विद्यालयातील प्राध्यापक व विद्यार्थ्यांनी विकसित केलेले बॅरल कॅरिअर असो किंवा सिलिंडर ट्रॉली दोन्ही संशोधनांना चांगला प्रतिसाद मिळत आहे. या यंत्रामुळे मानवी जीवन सुखकर होण्यास मदत होणार असल्याचे प्रात्यक्षिक सादरीकरणानंतर स्पष्ट झाले आहे.
- प्रकाश कडवे, प्राचार्य, के. के. वाघ पॉलिटेक्निक
===Photopath===
100521\10nsk_32_10052021_13.jpg~100521\10nsk_33_10052021_13.jpg
===Caption===
के के वाघ तंत्रनिकेतनच्या लिद्यार्थ्यांनी विकसित केलेली बॅरीयल कॅरीअर ट्रॉली व सिलिंडर कॅरिअर ट्रॉली~के के वाघ तंत्रनिकेतनच्या लिद्यार्थ्यांनी विकसित केलेली बॅरीयल कॅरीअर ट्रॉली व सिलिंडर कॅरिअर ट्रॉली