हिंगणवेढे हद्दीतील हिंगणवेढे ते दारणा सांगवी शिवरस्त्याची तहसीलदार अनिल दौंडे, तलाठी जी. एच. भुसारे यांनी पाहणी करून पंचनामा केला. हा रस्ता अंदाजे १०० वर्षांपासून वहिवाटीत असून, लगतच्या शेतकऱ्यांनी मोजणी केल्याने व त्यांच्या हद्दीत आल्याने त्यांंनी तो काढून टाकला होता; परंतु त्यामुळे पलीकडील शेतकऱ्यांचा येण्या- जाण्याचा मार्ग बंद होऊन, त्यांंना अडचणीचा सामना करावा लागत होता. त्यामुळे ग्रामपंचायत व ग्रामस्थांनी महसूल विभागाला पत्र देऊन रस्ता खुला करण्यासाठी योग्य ती कार्यवाही करावी यासाठी पाठपुरावा केला. त्यावर तहसीलदार यांनी पंचनामा करून, लगतच्या शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकून घेऊन, तोडगा काढण्याचे आश्वासन दिले.
पाहणीदरम्यान सरपंच राजू धात्रक, ग्रामसेवक ज्ञानेश्वर भोर, ग्रामपंचायत सदस्य तसेच ग्रामस्थ कृष्णा नागरे, सोमनाथ नागरे, खंडू धात्रक, पोलीसपाटील दयाजी शिंदे, सुनील वाघ, भाऊसाहेब आव्हाड, सोमनाथ धात्रक, संजय पगारे, सुभाष धात्रक व लगतचे शेतकरी उपस्थित होते.
फोटो- हिंगणवेढे-दारणा सांगवी वहिवाट रस्त्याची स्थळभेट पाहणी करून शेतकऱ्यांशी चर्चा करताना तहसीलदार अनिल दौंडे. समवेत तलाठी जी. एच. भुसारे, ग्रामसेवक ज्ञानेश्वर भोर, सरपंच राजू धात्रक, पोलीसपाटील दयाजी शिंदे आदींसह ग्रामस्थ.
180721\18nsk_40_18072021_13.jpg
हिंगणवेढे-दारणासांगवी वहिवाट रस्त्याची स्थळभेट पाहणी करुन शेतकऱ्यांशी चर्चा करतांना तहसिलदार अनिल दौंडे, तलाठी जी.एच.भुसारे, ग्रामसेवक ज्ञानेश्वर भोर, सरपंच राजु धात्रक, पोलिस पाटील दयाजी शिंदे व ग्रामस्थ