लासलगाव : लासलगाव येथील तीन कोरोना रूग्णामुळे निफाडचे तहसीलदार दिपक पाटील यांनी बुधवारी (दि.१) सायंकाळी लासलगाव येथील ग्रामपंचायत कार्यालयासमोर फिजिकल डिस्टन्सचा वापर करीत कटोन्टमेंट झोन बाबत कडक अंमलबजावणी करण्याची सुचना केली. लासलगावचे उपसरपंच जयदत्त होळकर, लासलगावचे सहायक पोलिस निरीक्षक खंडेराव रंजवे यांचे सह लासलगाव येथील शासकीय अधिकारी उपस्थित होते.निफाडचे तहसीलदार दिपक पाटील यांचे हस्ते लासलगाव ग्रामपंचायत मार्फत पुरविलेले प्लस आॅक्सीमीटर, थर्मस स्कॅनर यांचे वाटप आशा वर्कर यांना करण्यात आले.कोरोना संदर्भांत लासलगांव येथील सरपंच, ग्रामविकास अधिकारी शरद पाटील, पोलीस प्रशासन, ग्रामपालिका कर्मचारी, मंडळ अधिकारी, तलाठी यांना योग्य त्या सुचना दिल्या.(फोटो ०२ लासलगाव)लासलगाव येथे निफाडचे तहसीलदार दिपक पाटील लासलगाव ग्रामपंचायत मार्फत पुरविलेले प्लस आॅक्सीमीटर, थर्मस स्कनर यांचे वाटप आशा वर्कर यांना देत असुन लासलगावचे उपसरपंच जयदत्त होळकर, लासलगावचे सहायक पोलिस निरीक्षक खंडेराव रंजवे दिसत आहेत.
तीन कोरोना पॉझीटीव्ह रूग्णामुळे तहसीलदार यांनी कडक अंमलबजावणीच्या केल्या सुचना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 02, 2020 3:09 PM
लासलगाव : लासलगाव येथील तीन कोरोना रूग्णामुळे निफाडचे तहसीलदार दिपक पाटील यांनी बुधवारी (दि.१) सायंकाळी लासलगाव येथील ग्रामपंचायत कार्यालयासमोर फिजिकल डिस्टन्सचा वापर करीत कटोन्टमेंट झोन बाबत कडक अंमलबजावणी करण्याची सुचना केली. लासलगावचे उपसरपंच जयदत्त होळकर, लासलगावचे सहायक पोलिस निरीक्षक खंडेराव रंजवे यांचे सह लासलगाव येथील शासकीय अधिकारी उपस्थित होते.
ठळक मुद्देप्लस आॅक्सीमीटर, थर्मस स्कॅनर यांचे वाटप आशा वर्कर यांना करण्यात आले.