नाशिक : शहरातील विविध क्षेत्रांमध्ये चमकदार कामगिरी करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांचा स्वराज प्रतिष्ठानकडून तेजस्विनी पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. गंगापूररोडवरील एका लॉन्समध्ये कर्तृत्ववान महिलांना मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले. यावेळी महापौर रंजना भानसी, आमदार देवयानी फरांदे, प्रमुख पाहुणे म्हणून भारत विकास समूहाचे अध्यक्ष हणमंतराव गायकवाड, जिल्हा परिषद अध्यक्ष शीतल सांगळे, उपाध्यक्ष नयना गावित, रमाकांत जाधव, प्राचार्य राम कुलकर्णी, हेमंत राठी, नगरसेवक प्रशांत दिवे, नगरसेवक समिना मेमन, कोंडाजी आव्हाड, अॅड. आकश छाजेड, प्रीतिश छाजेड, नगरसेवक वत्सला खैरे आदी उपस्थित होते.आंतरराष्ट्रीय धावपटू मोनिका आथरे, पिनल वानखेडे, जि. प. सभापती मनीषा पवार, त्वचारोग तज्ज्ञ हेमांगी सागर, नगरसेविक आशा तडवी, उद्योजिक शिल्पा राका, डॉ. आशालता देवळीकर, कल्याणी दसककर, दीपाली चांडक, उमा बच्छाव, योगीता खांडेकर, शिल्पी अवस्थी, प्रज्ञा तोरस्कर, मोनालिसा जैन, आर. जे. दर्शना, पूनम बेडसे, मनीषा अहेर, नेहा खरे, रंजिता शर्मा, विद्या आहेर, प्राजक्ता अत्रे, मीना निकम-परुळेकर यांना गौरविण्यात आले.
तेजस्विनी पुरस्काराने कर्तृत्ववान महिलांचा सन्मान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2018 12:43 AM