‘शेतकºयांवरील गुन्हे मागे घ्यायला सांगा’
दिंडोरी : शेतकरी संपाच्या काळात बाहेरील शेतमाल रोखण्याचा प्रयत्न युवा शेतकºयांनी केला; मात्र पोलिसांनी या शेतकºयांवर गुन्हे दाखल केले. आंदोलनाच्या वाटाघाटीत शेतकºयांवरील संप काळात दाखल गुन्हे मागे घेण्याचे सूतोवाच सरकारने केले होते; मात्र तसे न होता सदर गुन्ह्यांची न्यायालयीन प्रक्रिया सुरू झाल्याने शेतकºयांमध्ये तीव्र नाराजी असून, दिंडोरी तालुक्यातील युवा शेतकºयांनी मोहाडी येथे माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांची भेट घेत आपली कैफियत मांडत गुन्हे मागे घेण्याबाबत मदत करण्याची मागणी केली.दहेगाव येथील ग्रामपंचायत सदस्य तथा राष्ट्रवादी युवक कार्यकर्ते अजित कड व युवकांनी भेट घेत व्यथा मांडली. शरद पवार यांनी त्यास सकारात्मक प्रतिसाद देत सर्व सविस्तर माहिती देण्याचे सांगत तुम्हाला न्याय मिळेल, असे आश्वासन दिले.