नाशिक : दोन दिवसांपासून ढगांनी शहरावर सावली धरल्यामुळे उन्हाच्या तप्त झळांपासून नाशिककरांना काहीसा दिलासाही मिळाला; मात्र रविवारी (दि.८) शहराचे कमाल तपमान ३८ अंशांपर्यंत पोहचले. त्यामुळे नाशिककरांना दिवसभर उन्हाचा चटका तीव्र स्वरूपात जाणवला. वाऱ्याचा वेगही मंदावल्यामुळे उकाडाही असह्य होत होता. रविवारच्या सुटीचा आनंद घेण्यासाठी नाशिककर घराबाहेर पडले; मात्र ते सूर्यास्तानंतर. दिवसभर शहरातील सर्वच भागातील रस्ते, दुकाने, बाजारपेठा तप्त उन्हामुळे ओस पडल्याचे चित्र पहावयास मिळाले. शालिमार, सीबीएस, मेनरोड, भद्रकाली, कॉलेजरोड, गंगापूररोड या भागांत शुकशुकाट जाणवला. दोन दिवसांपूर्वी शहराचे तपमान चाळिशीपर्यंत गेले होते; मात्र शुक्रवारपासून पुन्हा कमाल तपमानात घसरण झाली. ढग दाटून येऊ लागल्याने उन्हाची तीव्रता काही प्रमाणात कमी जाणवत होती; मात्र रविवारी पुन्हा सूर्याने आग ओकण्यास सुरुवात केल्याने संध्याकाळपर्यंत कमाल तपमानाचा पारा ३८ अंशांपर्यंत पोहचला. दिवसभर वाºयाचा वेगही मंदावलेला राहिल्याने नागरिकांना पंखे, वातानुकूलित यंत्रांद्वारे कृत्रीमरीत्या वारा मिळवावा लागला. रविवारपासून पुन्हा तपमान वाढू लागल्याने पुढील आठवड्यात कमाल तपमानाचा पारा चाळिशीपार जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे. उन्हाच्या वाढत्या तडाख्यामुळे नाशिककर सध्या त्रस्त झाले आहे. तप्त झळांनी नाशिककरांच्या अंगाची काहिली होत आहे. यामुळे तरुण गोदावरी, डाव्या कालव्याच्या पात्रात डुबकी लगावत वाढत्या उष्म्यापासून दिलासा मिळविण्याचा प्रयत्न करतानाही दिसून आले.
तपमान : कमाल तपमानाचा पारा पुन्हा चाळिशीच्या दिशेने उन्हाच्या तीव्र झळांनी तापले शहर ...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 09, 2018 1:18 AM
नाशिक : दोन दिवसांपासून ढगांनी शहरावर सावली धरल्यामुळे उन्हाच्या तप्त झळांपासून नाशिककरांना काहीसा दिलासाही मिळाला; मात्र रविवारी (दि.८) शहराचे कमाल तपमान ३८ अंशांपर्यंत पोहचले.
ठळक मुद्देवाऱ्याचा वेगही मंदावल्यामुळे उकाडाही असह्य ढग दाटून येऊ लागल्याने उन्हाची तीव्रता काही प्रमाणात कमी