खामखेडा : गावाच्या ग्रामदैवत असलेल्या श्रीराम मंदिराचे लोक सहभागातून बांधकाम झाले असून, ग्रामस्थांच्या सहकार्यातून साठ लाख रु पये खर्च करीत मंदिर साकारले गेले आहे. ग्रामस्थांनी यथाशक्ती आर्थिक मदत मंदिरास करीत जवळपास साठ लाख रु पये खर्चून मंदिराचे कामकाज पूर्ण झाले. ग्राम देवालयात एकत्रित महादेवनंदी, राम दरबार, दत्त भगवान, राधाकृष्ण, हनुमान, सूर्यनारायण या देवतांची एकत्रित मंदिरे तयार केली असून, सभामंडपदेखील तयार केला गेला आहे. मंदिराच्या देखण्या वास्तूमुळे गावाच्या वैभवात भर पडली आहे. गावातील अनेक शेतकरी, व्यावसायिक, नोकरदार ग्रामस्थांनी अकरा, एकवीस हजारापर्यंत मदत करीत मंदिराच्या कामास आर्थिक हातभार लावत ६० लाखापर्यंत मदत जमा केली. अडीच वर्षांपासून हाती घेतलेल्या ग्राम देवालयाच्या वास्तूचे नुकतेच काम पूर्ण झाले. जयपूर, राजस्थान येथून सर्व देवतांच्या मूर्ती आणल्या आहे.