लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : नाशिकहून बोंडरपाडा येथे जाणाऱ्या ४०७ टेम्पोचे गावधारा घाटात ब्रेक फेल होऊन उलटल्याने सात जण जखमी झाल्याची घटना रविवारी (दि़२१) दुपारच्या सुमारास गावधारा घाटात घडली़ अपघातातील सर्व जखमी देवळाली कॅम्पमधील संजय गांधी झोपडपट्टीतील रहिवासी असून, त्यामध्ये तीन लहान मुलांचाही समावेश आहे़ खर्डी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नाशिकहून बोंडरपाडा येथे जात असलेल्या ४०७ टेम्पोतून (एमएच १७, ए ६८४३) देवळाली कॅम्पमधील संजय गांधीनगर झोपडपट्टीतील अजय ठाकरे (२१), संदीप वाघ (१२), प्रवीण वाघ (८), जितू वाघ (७), भीमा पवार (२३), उषा पोळे (२३) व अलका पवार (२७) हे प्रवास करीत होते़ गावधारा घाटातून जात असताना अचानक टेम्पोचे ब्रेक फेल झाल्याने टेम्पो उलटला़ यामध्ये हे सातही जण जखमी झाले़या अपघातातील जखमींना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे़ दरम्यान, या अपघाताची खर्डी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे़
गावधारा घाटात टेम्पो उलटून सात जखमी
By admin | Published: May 22, 2017 2:52 AM