चांदोरी : सुकेणारोड भागात लागलेल्या आगीत सुमारे दहा एकर ऊस जळून खाक झाला. त्यामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. वीजवाहक तारा तुटल्याने उसाला आग लागल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.चांदोरी येथील संपत आहेर गट नं. ८६५ अडीच बिघे, निवृत्ती आहेर गट नं. ८६६ तीन बिघे, इंदूबाई गडाख गट नं. ८५५ तीन बिघे, पुष्कर भन्साळी गट नं. ८७३ चार बिघे या शेतकºयांचा ऊस व तुषार खरात यांच्या एक एकर द्राक्षबागेला आग लागली. ही घटना बुधवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास घडली.या उसाच्या क्षेत्रावरून वीजवाहक तारा गेल्या आहेत. तर काही ठिकाणी या तारा हाताच्या उंचीप्रमाणे आहे. वीजवाहक तारांमध्ये घर्षण होऊन ठिणग्या उसाच्या शेतात पडल्या. त्यामुळे उसाने पेट घेतला. शिवाय वाºयाचे प्रमाण ही जास्त असल्याने आग पसरली गेली. ही घटना तत्काळ लक्षात आल्याने शेतकरी व नागरिकांनी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न केला.यामुळे बाजूलाच असलेल्या उसाच्या क्षेत्राला हानी पोहोचू शकलीनाही.-----------------------जळालेल्या १० एकर क्षेत्रापैकी ८ एकर क्षेत्रावरील ऊस तोडणीला आलेला होता. लॉकडाउन असल्याने रसवंती बंद होती, उद्यापासून त्या उसाची तोडणी चालू करायची होती. त्यापूर्वीच शॉर्टसर्किटने आग लागल्याने तसेच तुषार खरात यांची द्राक्ष लॉकडाउनच्या काळात ५ रु . किलोने देऊन नुकसान झाले. त्यात अशी परिस्थिती निर्माण झाल्याने दुहेरी संकट निर्माण झाले आहे. महावितरण विभागाच्या गलथान कारभारामुळे सदर आग लागून शेतकºयांचे लाखो रु पयांचे नुकसान झाले आहे.- संदीप आहेर, शेतकरी
चांदोरीत दहा एकर ऊस खाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2020 10:10 PM