मनमाड : येथील स्थानकात धावत्या रेल्वेगाडीत प्रवाशांना मारझोड करून लुटणाºया वेगवेगळ्या घटनांतील दहा चोरट्यांना पकडण्यात रेल्वे सुरक्षा बलाला यश आले. संशयितांकडून रोख रकमेसह मोबाइल आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे. बंगळुरूहून दिल्लीकडे जाणाया कर्नाटक एक्स्प्रेसमध्ये दौंड-अहमदनगर प्रवाासात सर्वसाधारण डब्यात ६ तरुणांनी प्रवाशांना मारझोड करत लुटण्यास सुरुवात केली. काही प्रवाशांनी धाडस करून चोरट्यांचा प्रतिकार करत चांगलाच चोप दिला. यातील चार चोरट्यांना प्रवाशांनी पकडून रेसुब कर्मचाºयांना कळवले. सोमनाथ साळवे, सादिक शेख, ज्ञानदेव सोनटक्के आणि प्रभू वडिर्ले या चारही चोरट्यांंना रेसुब कर्मचाºयांनी ताब्यात घेतले.रेसुबचे सुरक्षा आयुक्त अजय दुबे यांच्या मार्गदर्शनाखाली रेसुब निरीक्षक के. डी. मोरे अश्विनी पटेल, ए. एन. देवरे, एल. आर. अलगुडे, शिवानंद गिते, सुरेन्द्र कुमार, समाधान गांगुर्डे, डी. के.तिवारी, बी. ए. पाटील, नितीन तुपाके आदींनी महत्त्वाची भूमिका बजावली. दिल्ली-बंगळूर कर्नाटक एक्स्प्रेस मनमाड स्थानकात उभी असताना तीन चोरटे डब्यात धुमाकूळ घालत असल्याची माहिती आरपीएफच्या जवानांना मिळाली. त्यांनी धाव घेत आरिफ तंबोळी, देवानंद महाजन आणि शाहरुख पठान या तिघांना ताब्यात घेतले, तर तिसºया घटनेत मुंबईकडे जाणाºया कामयानी एक्स्प्रेसमध्ये प्रवाशांचे पाकीट मारताना मो. युनूस याला रंगेहात पकडले. शालिमार एक्स्प्रेस मध्ये प्रवासादरम्यान प्रवाशांना लुटणाया दोन जणांना रेसुब कर्मचाºयांनी ताब्यात घेतले.
रेल्वेत चोऱ्या करणाया दहा भामट्यांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2018 12:16 AM