सुरगाणा : सुरगाणा नगरपंचायत निवडणुकीसाठी सोमवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी एकूण दहा उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याने आता ५८ उमेदवार निवडणूक रिंगणात शिल्लकअसून प्रथमच लढविल्या जाणाऱ्या या ऐतिहासिक नगरपंचायतीच्या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.येथील एकूण १७ प्राभागांमध्ये राजकीय पक्षांचे व अपक्ष असलेले वॉर्डनिहाय उमेदवार : वॉर्ड क्र .१ : तृप्ती दीपक चव्हाण (शिवसेना), सुलोचना नरेंद्र चव्हाण (माकप), वॉर्ड क्र .२ : शेवंता प्रकाश वळवी (शिवसेना), पारिबाई रामू गावित (माकप), पारिबाई संजय पवार (भाजप), वॉर्ड क्र .३ शामू नागू पवार (अपक्ष), दिनेश श्रीराम चव्हाण (शिवसेना), अकिल पठाण (माकप), सचिन रामदास चव्हाण (राष्ट्रीय कॉँग्रेस), दिनकर मुरलीधर पिंगळे (भाजपा), वॉर्ड क्र .४ : विजय कानडे (भाजपा), अब्बास शेख (माकप). वॉर्ड क्र .५ : भारत लक्ष्मण वाघमारे (शिवसेना), कमलाकर भोये (अपक्ष), रमेश थोरात (माकप), यशवंत ब्राम्हणे (राष्ट्रीय कॉँग्रेस), वॉर्ड क्र. ६ : सुरेखा बोरसे (शिवसेना), शोभा पिंगळे (भाजपा), रूपाली सोमवंशी (माकप), वॉर्ड क्र. ७ : धनराज कानडे (भाजपा), सचिन रमेश अहेर (शिवसेना), नामदेव सोमवंशी (माकप), वॉर्ड क्र. ८ : पुष्पा वाघमारे (शिवसेना), चंद्रभागा चव्हाण (भाजपा), रजनी महाले (माकप), मीना भगरे (राष्ट्रवादी), वॉर्ड क्र .९ : प्रमिला भोये (शिवसेना), जयश्री धूम (राष्ट्रवादी कॉँग्रेस), कविता चव्हाण (माकप), ताराबाई भगरे (राष्ट्रवादी कॉँग्रेस), योगीता पवार (भाजपा), वॉर्ड क्र .१० : सचिन रामदास महाले (शिवसेना), राजेंद्र कानडे (अपक्ष), देवीदास भोये (कॉँग्रेस), दीपक थोरात (माकप), राहुल अहेर (भाजपा), वॉर्ड क्र .११ : दीपाली विनोद महाले (भाजपा), रूपाली चापळकर (शिवसेना), सोनाली बागुल (माकप), वॉर्ड क्र. १२ : सविता चव्हाण (शिवसेना), ज्योती चव्हाण (राष्ट्रीय कॉँग्रेस), जयश्री शेजोळे (भाजपा), सोनाली लाडे (माकप), वॉर्ड क्र . १३ : मंगेश शेवरे (शिवसेना), आनंदा वाघमारे (भाजपा), देवराम डंबाळे (राष्ट्रवादी), रामकृष्ण पवार (माकप), वॉर्ड क्र. १४ : मंदा गायकवाड (शिवसेना), कुसूम पवार (माकप), रंजना लहरे (भाजपा), वॉर्ड क्र .१५ : रेश्मा चौधरी (भाजपा), पद्मा सूर्यवंशी (माकप), आशा पवार (शिवसेना). वॉर्ड क्र .१६ : आनंदा चौधरी (माकप), सुरेश गवळी (भाजपा). वॉर्ड क्र. १७ : रामदास खंबाईत (राष्ट्रवादी कॉँग्रेस), लक्ष्मण रहेराव (शिवसेना), आनंदा चौधरी (माकप) याप्रमाणे एकूण ५८ उमेदवार प्रथम नगरसेवकाचा मान प्राप्त करण्यासाठी निवडणूक रिंगणात आहेत.दरम्यान, वॉर्ड क्र . ६ मधून अर्ज छाननीवेळी अवैध ठरलेल्या माकपच्या उमेदवार रूपाली सोमवंशी यांचा उमेदवारी अर्ज न्यायालयाने त्यांच्या बाजूने वैध ठरविला असून, त्यांना निवडणूक लढविता येणार आहे. (वार्ताहर)
सुरगाण्यात दहा उमेदवारांची माघार
By admin | Published: October 20, 2015 12:01 AM