ओझर:येथील पोलिसांनी कसबे सूकेणे -ओझर रस्त्यावर एकूण दहा गोवंश जनावरे कत्तलीसाठी घेऊन जाणाऱ्या दोन पिकअप वाहनांवर पोलिसांनी छापा मारत तीन जणांना ताब्यात घेतले आहे.सायंकाळी सात च्या सुमारास कसबे सुकेनेतून ओझरमार्गे अन्यत्र ठिकाणी दोन पिकअप वाहन दहा गोवंश जनावरांना कत्तलीसाठी घेऊन जात असल्याची ओझर पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली.त्यात ग्रामपंचायत कसबे सूकेणे हद्दीजवळ पोलिसांनी वाहन अडवले असता वाहनचालकांनी उडवाउडवीची उत्तरे दिली.पोलिसांनी तिघांना ताब्यात घेत सखोल चौकशी केली असता त्यात कत्तलीसाठी घेऊन जात असलेले दहा गोवंश आढळून आले.त्यात चार बैल आणि सहा गायी या कोंबलेल्या अवस्थेत आढळून आल्या.त्याची मूळ किंमत सुमारे 3 लाख 78 हजारच्या जवळपास असून सदर कार्यवाहीत ज्ञानेश्वर अर्जुन गायकवाड,गजेंद्र हिरामण साबळे दोन्ही रा.रानवड ता.निफाड तर संदीप अनिल बलसाने रा.ओढा ता.जि.नाशिक यांना ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केला आहे.सदर जनावरे कुठून आली आणि मधल्या रस्त्याने नेमकी कुठे कत्तलीसाठी नेली जात होती याचा तपास पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांच्यासह हवालदार बापू आहेर यांच्यासह ओझर पोलीस करत आहे.चौकट:विश्वसनिय सूत्रांनी दिलेल्या महितीनुसार पिंपळगाव बसवंत हे गोवंश व्यवहाराचे केंद्रस्थान म्हणून पुढे येत असल्याचे बोलले जाते.सदर गोवंश जनावरांचे व्यवहार मोठ्या प्रमाणावर पिंपळगाव येथील वणी चौफुली,खेडगाव गाव रोड व एका राजकीय पक्षाच्या वरिष्ठ नेत्याच्या मळ्यात होत असल्याची चर्चा पुन्हा एकदा जोमाने झाल्याचे बोलले जाते.पोलिसांनी सदर प्रकरणाची सखोल चौकशी केल्यास मोठे रॅकेट हाती लागेल असा विश्वास गोवंश प्रेमींनी व्यक्त केला आहे.
कत्तलीसाठी जाणारे दहा गोवंश ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2020 01:01 IST
ओझर:येथील पोलिसांनी कसबे सूकेणे -ओझर रस्त्यावर एकूण दहा गोवंश जनावरे कत्तलीसाठी घेऊन जाणाऱ्या दोन पिकअप वाहनांवर पोलिसांनी छापा मारत तीन जणांना ताब्यात घेतले आहे.
कत्तलीसाठी जाणारे दहा गोवंश ताब्यात
ठळक मुद्देओझर पोलिसांच्या कारवाईत तिघांविरोधात गुन्हा दाखल