नाशिक : गेल्या दहा दिवसांपासून दडी मारून बसलेल्या पावसाने शुक्रवारी रात्री जोरदार हजेरी लावल्याने उकाड्याने हैराण झालेल्या नाशिककरांना दिलासा मिळाला. जिल्ह्यात सर्वदूर पाऊस अडून बसल्याने सर्वत्र चिंतेचे ढग दाटले होते मात्र रात्रीपासून सुरू झालेल्या पावसामुळे नाशिककर सुखावले आहेत. नाशिकरोड परिसरात सर्वप्रथम पावसाच्या सरी कोसळल्या आणि त्यानंतर टप्प्याटप्प्याने उपनगरांमध्ये चांगला पाऊस झाला.शहरासह जिल्ह्यात पावसाने उघडीप दिल्यामुळे सर्वांनाच पावसाची प्रतीक्षा लागली होती. हवामान खात्याने दि. १९ आणि दि. २० रोजी जिल्ह्यात चांगल्या पावासाला सुरुवात होण्याचा अंदाज वर्तविला असल्यामुळे शुक्रवारी पाऊस होणार की नाही याकडेदेखील सर्वांचे लक्ष लागलेले असताना रात्रीच्या सुमारास ढगांच्या गडगडाटासह झालेल्या पावसामुळे नाशिककर सुखावले आहेत.शहरातील नाशिकरोड, जेलरोड, उपनगर, सिडको, पंचवटी, सातपूर या परिसरात जोरदार पाऊस झाला. विजांचा कडकडाटांसह झालेल्या पावसामुळे शहरातील काही भागांतील वीजपुरवठादेखील खंडित झाला होता. रस्त्यांवरून पाण्याचे पाट वाहत होते.शुक्रवारी सकाळपासूनच वातावरणात कमालीचा उकाडा निर्माण झाल्याने नागरिक हैराण झाले होते. गेल्या काही दिवसांपासून उकाडा जाणवत असल्यामुळे पावसाच्या सरी कोसळल्याची सर्वांनाच प्रतीक्षा होती.
दहा दिवसांनंतर कोसळल्या सरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2019 1:06 AM
गेल्या दहा दिवसांपासून दडी मारून बसलेल्या पावसाने शुक्रवारी रात्री जोरदार हजेरी लावल्याने उकाड्याने हैराण झालेल्या नाशिककरांना दिलासा मिळाला. जिल्ह्यात सर्वदूर पाऊस अडून बसल्याने सर्वत्र चिंतेचे ढग दाटले होते मात्र रात्रीपासून सुरू झालेल्या पावसामुळे नाशिककर सुखावले आहेत.
ठळक मुद्देदिलासा : रात्री आठनंतर शहर परिसरात पावसाची हजेरी