सुरगाणा : शहरासह तालुक्यात पॉझिटिव्ह रुग्ण वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर मेडिकल आणि दवाखानावगळता इतर सर्व व्यवसाय शुक्रवारपासून (दि.७) दहा दिवस बंद ठेवण्यात येणार आहेत.याआधीच तालुक्यातील आठवडे बाजार बंद करण्यात आले आहेत, तर सुरगाणा येथे शुक्रवार, शनिवार व रविवार असे तीन दिवस बंद पाळण्यात येत आहे तर सोमवार ते गुरुवार सकाळी ७ ते सकाळी वाजेपर्यंत अत्यावश्यक सेवा सुरू ठेवण्यात आली असली तरीदेखील पॉझिटिव्ह रुग्ण वाढत असल्याने तर काहींचा मृत्यू झाल्याने चर्चेअंती शुक्रवारपासून १६ मेपर्यंत फक्त मेडिकल व दवाखानेवगळता इतर सर्व व्यवसाय पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे.यादरम्यान नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यावसायिक व नागरिकांवर कठोर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. दरम्यान, ७ तारखेपासून दहा दिवस बंद राहणार असल्याने गुरुवारी नागरिकांची खरेदीसाठी गर्दी झाली होती.(०६ सुरगाणा)सुरगाणा तालुका दहा दिवस बंद ठेवण्यात येणार असल्याने येथील मुख्य बाजारपेठेत खरेदीसाठी नागरिकांची झालेली गर्दी.
सुरगाण्यात आजपासून दहा दिवसांचा बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 06, 2021 11:01 PM
सुरगाणा : शहरासह तालुक्यात पॉझिटिव्ह रुग्ण वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर मेडिकल आणि दवाखानावगळता इतर सर्व व्यवसाय शुक्रवारपासून (दि.७) दहा दिवस बंद ठेवण्यात येणार आहेत.
ठळक मुद्दे व्यावसायिक व नागरिकांवर कठोर दंडात्मक कारवाई केली जाणार