नाशिक : मराठा विद्या प्रसारक शिक्षण संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीत उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी २४ तासांचा अवधी बाकी असतानाही बुधवारी (दि. २) दहा जणांची माघार झाली. जिल्हा परिषद सदस्य शंकरराव धनवटेयांच्यासह दहा जणांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले. उद्या (दि.३) गुरुवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत आहे.मराठा विद्या प्रसारक शिक्षणसंस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीत २१ ते २७ जुलैपर्यंत उमेदवारी अर्जांचे वाटप तर २३ ते २७ जुलैदरम्यान उमेदवारी अर्ज स्वीकारण्याची कार्यवाही करण्यात आली. तसेच २८ जुलैला छाननी होऊन त्यात पाच उमेदवारी अर्ज बाद करण्यात येऊन ३३८ उमेदवारांचे अर्ज शिल्लक होते. सोमवारी (दि. ३१) विद्यमान संचालक श्रीराम शेटे यांच्यासह नानासाहेब दाते, नंदा सोनवणे व गुलाबराव भामरे यांचे अर्ज लवादाने अपात्र ठरविले होते. त्यामुळे एकूण ३३३ अर्ज शिल्लक होते. बुधवारी (दि. २) उमेदवारी अर्ज मागे घेणाºयांमध्ये नाशिक ग्रामीणमधून जिल्हा परिषद सदस्य शंकरराव धनवटे यांच्यासह सरचिटणीस संवर्गातून चंद्रभान बोरस्ते, चिटणीस व उपसभापती संवर्गातून नारायण पवार, प्राथमिक व माध्यमिक नानाजी देसले, आनंदराव घोटेकर (निफाड), विशाल सोनवणे (सटाणा), शंकरराव हांडगे (नाशिक शहर), विलास मत्सागर व विनायक खालकर (निफाड) या उमेदवारांचा समावेश आहे.समाज विकास पॅनल व प्रगती पॅनल या दोन्ही पॅनलने तालुकानिहाय दौºयांना सुरुवात केली असून, गुरुवारी (दि. ३) उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी दोन्ही पॅनलच्या उमेदवारांची अधिकृत घोषणा करण्यात येणार आहे.
दहा जणांची माघार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 02, 2017 11:29 PM