नाशिक : बनावट नोटा छापल्याप्रकणी अटकेत असलेला राष्ट्रवादी कॉँग्रेसचा माजी पदाधिकारी छबू नागरेसह दहा संशयित आरोपींना येत्या २ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश जिल्हा न्यायालयाने दिले. पुणे आयकर विभाग युनिट एक व आडगाव पोलिसांनी गुरुवारी (दि़ २२) मध्यरात्री मुंबई-आग्रा महामार्गावर सापळा रचून ११ संशयितांकडून १़३५ कोटी रुपयांच्या बनावट नोटा जप्त केल्या होत्या. या गुन्ह्यात अटक केलेल्या संशयितांमध्ये छबू नागरे, महापालिकेचा माजी घंटागाडी ठेकेदार रामराव पाटील व सिन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती रमेश पांगारकर यांच्यासह आदि संशयितांना न्यायालयाने २९ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. या सात दिवसांची पोलीस कोठडीची मुदत गुरुवारी (दि.२९) संपल्यानंतर या सर्व संशयितांना पोलिसांनी जिल्ह्यत न्यायालयात हजर केले. यावेळी सरकारी वकील अॅड. सुनीता चिताळकर यांनी सरकारच्या वतीने बाजू मांडत गुन्'ाच्या पुढील तपासासाठी तसेच गुन्'ाची व्याप्ती मोठी असल्यामुळे सात दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी केली. यावेळी तपास अधिकारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय सानप यांनी संशयित आरोपींची संख्या जास्त असल्यामुळे तपासात अडचणी निर्माण होत असून, संशयितांकडून माहिती देण्यास टाळाटाळ केली जात आहे. तसेच काही संशयितांवर विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल असून, मोठी टोळी या गुन्'ामागे असू शकते असे न्यायालयापुढे सांगितले. नागरेचा साथीदार कृष्णा अग्रवालचा पोलीस शोध सुरू आहे. न्यायाधीश डिंपल देढीया यांनी दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकत अकरा संशयितांच्या पोलीस कोठडीत येत्या २ जानेवारीपर्यंत वाढ केली आहे. यामुळे या सर्व संशयितांचे नवीन वर्षाला क ोठडीत सुरुवात होणार आहे....या संशयिताना पोलीस कोठडीबनावट नोटा छपाई प्रकरणी न्यायालयाने संशयित छबू दगडू नागरे, रामराव तुकाराम पाटील, रमेश गणपत पांगारकर, संदीप संपतराव सस्ते, ईश्वर मोहन परमार, राकेश सरोज परमार, नीलेश सतीश लायसे, प्रभाकर केवल घरटे, संतोष भीमा गायकवाड, गौतम चंद्रकांत जाधव, प्रवीण संजयराव मांढरे या अकरा संशयिताना सोमवारपर्यंत (दि़ २ जानेवारी) पोलीस कोठडी सुनावली आहे़नातेवाइकांचा गोतावळाबनावट नोटा छापल्याप्रकरणी अटकेत असलेल्या अकरा संशयित आरोपींना दुपारी न्यायालयात आणण्यात आले. यावेळी न्यायालयाच्या आवारात या सर्व संशयितांच्या नातेवाइकांचा गोतावळा पहावयास मिळाला. दरम्यान, काही नातेवाइकांच्या डोळ्यांमध्ये यावेळी अश्रूही तरळले. वाढीव पोलीस बंदोबस्तामध्ये सर्व संशयितांना न्यायालयात हजर करण्यात आले.
नागरेसह दहा संशयितांच्या कोठडीत वाढ
By admin | Published: December 29, 2016 11:30 PM