सिडको : अंबड लिंकरोड भागात पोलिसांनी तडीपार गुंड अक्षय उत्तम जाधव( २४, रा. चुंचाळे ) याच्यासोबत दुचाकीचोरी करणाऱ्या त्याच्या दोन साथीदारांनाही सापळा रचून अटक केली असून, या तिघांकडूनही तब्बल दहा दुचाकी जप्त करण्यात आल्याची माहिती पोलीस उपायुक्त विजय खरात यांनी शुक्रवारी (दि.२१) अंबड पोलीस ठाण्यातील पत्रकार परिषदेत माहिती दिली. अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हे शोध पथकाचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी मोटारसायकल चोरी करणारे गुन्हेगार यांचा शोध घेत असताना सहायक पोलीस निरीक्षक गणेश शिंदे यांना गुप्त बातमीदारामार्फत दोन संशयित अंबड संशयितरीत्या फिरत असल्याची माहिती मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या आधारे गुन्हे शोध पथकाने अंबड लिंकरोड परिसरात सापळा रचून संशयित आरोपी रोहित उर्फ गणेश नितीन मालुंजकर (२०, रा. देवळाली कॅम्प) व ऋषिकेश शशिकांत जाधव (२१, रा. ढिकले मळा, नाशिकरोड) यांना घेतले. त्याची कसून चौकशी केल्यानंतर त्यांच्याकडून नऊ दुचाकी हस्तगत करून एकूण तीन लाख रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला. तसेच तडीपार गुंड अक्षय उत्तम जाधव यालाही अटक करीत त्याच्याकडून चोरलेली एक दुचाकी जप्त केली आहे.
तडीपार गुंडासह दोन साथीदारांकडून चोरीच्या दहा दुचाकी जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2021 1:10 AM
अंबड लिंकरोड भागात पोलिसांनी तडीपार गुंड अक्षय उत्तम जाधव( २४, रा. चुंचाळे ) याच्यासोबत दुचाकीचोरी करणाऱ्या त्याच्या दोन साथीदारांनाही सापळा रचून अटक केली असून, या तिघांकडूनही तब्बल दहा दुचाकी जप्त करण्यात आल्याची माहिती पोलीस उपायुक्त विजय खरात यांनी शुक्रवारी (दि.२१) अंबड पोलीस ठाण्यातील पत्रकार परिषदेत माहिती दिली.
ठळक मुद्देपोलिसांची कारवाई : सापळा रचून दोन साथीदारही घेतले ताब्यात