घोटी : अतिपावसामुळे गेल्या आठवड्यापासून नुकसानग्रस्त झालेल्या १२६ गावांतील ९३९० शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. पूरिस्थती आणि अतिपावसामुळे इगतपुरी तालुक्यातील १० हजार ३४९ हेक्टर क्षेत्राचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या पाशर््वभूमीवर इगतपुरीचे तालुका कृषी अधिकारी शितलकुमार तंवर यांनी आपल्या अधिकार्यांसह गावोगावी भेटी देणे सुरू केले आहे. नुकसानग्रस्त शेतकर्यांच्या नुकसानीची पाहणी करतांना शासकीय अधिकार्यांच्याही डोळ्यांत पाणी येत आहे. शेतकर्यांना दिलासा देण्यासाठी कृषी विभागामार्फत तातडीने पंचनामे करण्यात येत आहेत. नुकसानीचा सर्वांगीण अहवाल शासनाला पाठवून शक्य तेवढ्या लवकर आपद्ग्रस्तांना दिलासा देण्याची कार्यवाही युद्धपातळीवर सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.अतिपावसामुळे शेती क्षेत्राच्या नुकसानग्रस्त गावांतील शेतकर्यांचा शेतीची पाहणी तालुका कृषी अधिकारी शितलकुमार तंवर यांच्या नेतृत्वाखाली सुरू आहे. कृषी विभागाकडून क्षेत्रभेटी करून नुकसानीचे वस्तुनिष्ठ पंचनामे करण्यात येत आहेत. पारंपरिक पीक असणाºया भात पिकाचे न भूतो न भविष्यती असे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. यासह इतरही विविध पिकांचेही नुकसान झालेले आहे.
इगतपुरी तालुक्यात दहा हजार हेक्टर शेतीचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2019 3:29 PM