नाशिक : अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा गुन्हा न्यायालयात सिद्ध झाल्याने अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश उर्मिला फलके-जोशी यांनी निफाड तालुक्यातील धानोरी येथील आरोपी ज्ञानेश्वर उर्फ विनायक पंडित वाघ (२९) यास दहा वर्षे सक्तमजुरी व ३५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे़निफाड तालुक्यातील धानोरी येथे २२ जुलै २०१३ रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास पाऊस सुरू होता़ यादरम्यान एक १२ वर्षीय मुलगी शौचावरून घरी जात होती़ त्यावेळी दुचाकीवरून जात असलेला आरोपी ज्ञानेश्वर उर्फ विनायक पंडित वाघ (२९, धानोरी, ता़ निफाड, जि़ नाशिक) याने मुलीला थांबविले व तिच्या छत्रीचा आधार घेतला़ यानंतर शेजारी असलेल्या एका सीमेंट पाइपच्या मोरीमध्ये मुलीला उचलून नेऊन तिच्यावर अत्याचार केला़ या प्रकरणी सिन्नर पोलीस ठाण्यामध्ये बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला होता़ नाशिकच्या जिल्हा व सत्र न्यायालयात हा खटला सुरू होता़ या खटल्यात सरकारी वकील सुप्रिया गेरे यांनी अकरा साक्षीदार तपासले़ त्यांनी दिलेल्या साक्षीनुसार आरोपी ज्ञानेश्वर पंडितवरील आरोप सिद्ध झाले़ त्यास न्यायालयाने दहा वर्षांची सक्तमजुरी व ३५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली़ (प्रतिनिधी)
अत्याचार प्रकरणी दहा वर्षे सक्तमजुरी
By admin | Published: December 23, 2014 12:21 AM