शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
2
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
3
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
4
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
5
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
6
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
7
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
8
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
9
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
10
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
11
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
12
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
13
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
14
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
15
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
16
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
17
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
18
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
19
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
20
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!

भाडेकरूंना द्यावे लागणार आधारकार्डासह पुरावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2017 11:44 PM

शहरात आता घर भाड्याने घ्यायचे असेल तर आधारकार्ड, पॅनकार्डसारखे पुरावे द्यावे लागणार आहेत. पाथर्डी फाटा येथे एका इमारतीत अहमदनगर येथील कुख्यात गुन्हेगार भाड्याने राहत असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर इंदिरानगर पोलीस ठाण्यात इस्टेट एजंट्सची तातडीने बैठक घेण्यात आली. यावेळी भाडेतत्त्वावर घर देणारे घरमालक तथा घर मिळवून देणारे एजंट यांनी भाडेकरुंची माहिती पुराव्यासह पोलिसांना द्यावी, असे प्रतिपादन सहायक पोलीस आयुक्त सचिन गोरे यांनी केले़

इंदिरानगर : शहरात आता घर भाड्याने घ्यायचे असेल तर आधारकार्ड, पॅनकार्डसारखे पुरावे द्यावे लागणार आहेत. पाथर्डी फाटा येथे एका इमारतीत अहमदनगर येथील कुख्यात गुन्हेगार भाड्याने राहत असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर इंदिरानगर पोलीस ठाण्यात इस्टेट एजंट्सची तातडीने बैठक घेण्यात आली. यावेळी भाडेतत्त्वावर घर देणारे घरमालक तथा घर मिळवून देणारे एजंट यांनी भाडेकरुंची माहिती पुराव्यासह पोलिसांना द्यावी, असे प्रतिपादन सहायक पोलीस आयुक्त सचिन गोरे यांनी केले़  गोरे यांनी सांगितले की, घरमालक वा एजंट यांनी घर भाडेतत्त्वावर देताना संबंधित भाडेकरूंची माहिती प्रथम संबंधित पोलीस ठाण्यात द्यावी़ पोलिसांकडून संबंधित भाडेकरूंची पूर्ण माहिती तपासली जाणार असून, तो गुन्हेगार तर नाही याची खात्री केली जाणार आहे़ यामुळे गुन्हेगारांना आश्रय मिळणार नाही तसेच गुन्हेगारी रोखण्यासही मदत होईल़  गुन्हेगार भाडेकरूंच्या रुपाने शहरात राहून शांतता भंग करू नये यासाठी घरमालक आणि भाडेकरू यांच्यावर हे निर्बंध घालण्यात आले आहे़ त्यामुळे घर भाडेतत्त्वावर देताना घरमालक वा एजंट यांनी ओळखपत्र म्हणून आधार कार्ड, रेशन कार्ड, इलेक्शन कार्ड, पॅन कार्ड, वाहनपरवाना यापैकी एक छायांकित प्रत घेणे व फॉर्म भरून संबंधित पोलीस ठाण्यात देणे बंधनकारक आहे़ असे न करणाºया संबंधित एजंट व घरमालकांवर गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचे गोरे म्हणाले़ या बैठकीस पोलीस निरीक्षक कुमार चौधरी, उपनिरीक्षक गावित यांसह परिसरातील सुमारे चाळीस एजंट उपस्थित होते.