एकलहरे: नाशिक तालुका पुर्व भागातील अनेक गावांमध्ये शेतीला पूरक म्हणुन दूध उत्पादन व्यवसायाला प्राधान्य देण्यात आले आहे.परिसरातील अनेक शेतकऱ्यांनी त्यासाठी दुधाळ गायी, म्हशी, शेळी पालन करुन दुध व दुधापासून बनविलेल्या पदार्थांची विक्री करुन कुटुंबास आर्थिक हातभार लावला आहे.विशेषत: हिंगणवेढे शिवारातील शेतकºयांकडे दुधाळ गाई, म्हशी, शेळ्या मोठ्या प्रमाणात आढळतात. प्रत्येक शेतकºयाकडे किमान आठ ते दहा गाई असल्याने त्यांच्यापासून वर्षभर कमी, अधिक प्रमाणात दुध उत्पादन मिळत असते. या भागात बाराही महिने हिरवा चारा जनावरांसाठी उपलब्ध होत असतो. उन्हाळ्यात मुरघास, सुका चारा, ढेप, कडबा याचे नियोजन केले जाते. दुधाळ जनावरांसाठी गोठे तयार करुन त्यात गाई, म्हशींच्या आरोग्याची काळजी घेऊन दुग्ध व्यवसाय केला जातो. एक कुटुंब रोज सरासरी 80 ते 100 लिटर दुधाची विक्री करते. गावातील दुध डेअरीत रोज सायंकाळी 20 ते 22 रुपये लिटरप्रमाणे दुधाची विक्री केली जाते. त्यातून सरासरी 40 ते 50 हजार रुपयांचे मासिक उत्पन्न मिळते. जनावरांचा चारा, खाद्य, औषधे वगैरेसाठीचा खर्च वजा जाता महिन्याला 25 ते 30 हजार रुपये घरखर्चासाठी शिल्लक राहतात. ज्या शेतकºयांना कमी शेती आहे त्यांना दुग्ध व्यवसाय करणे फायदेशीर ठरते, असे हिंगणवेढे येथील दुग्ध व्यावसाईक जयवंत रंभाजी धात्रक सांगतात.याभागात दुग्ध व्यवसायासाठी गावठी, गीर, संकरीत गार्इंना पसंती दिली जाते. यासाठी आजुबाजुला असलेल्या मोकळ्या रानात गाई चरावयास नेल्या जातात. कधी डेरी वाल्यांकडून दुध खरेदीसाठी अडचण आली तर त्याच दुधापासून दही, ताक, खवा, पनीर तयार करुन विक्री करता येते.शेतीला जोडधंदा म्हणुन सुरवातीला दोन गाई घेतल्या. गडी माणसे शेतात राबत असल्याने मी स्वत:च गार्इंचे दुध काढून गावातील डेरीला देत असे. वर्षभरातच मागणी वाढल्याने पुन्हा चार गाई खरेदी केल्या. रोज 70 ते 80 लिटर दुध निघते.घरी वापरासाठी एक दोन लिटर दुध ठेऊन बाकीचे डेरीला विकता येतÞे. त्यातून घरखर्च, लाईटबिल, किरणामाल, किरकोळ खर्च भागविला जातो.- मंदाबाई धात्रक- दुध उत्पादक, हिंगणवेढे.