नाशिक : स्मार्ट सिटी अंतर्गत पाणीपुरवठा मनपाच्या विभागाचे आधुनिकीकरण करतानाच पाण्याची होणारी गळती आणि जल व्यवस्थापनाच्या नियोजनासाठी स्काडा मीटरची निविदा पुन्हा एकदा काढण्यात आली आहे. यापूर्वी या निविदेत परस्पर फेरबदल केल्याच्या संचालकांच्या आरोपावरून वादग्रस्त ठरलेली ही निविदाप्रक्रिया रद्द करण्यात आली होती. आता आचारसंहितेपूर्वी स्काडा मीटरचा मुहूर्त साधण्यात आला आहे.स्मार्ट सिटी अंतर्गत पाण्याची होणारी गळती रोखण्याबरोबरच ग्राहकांना अचूक पाण्याचे बिल देण्यासंदर्भात कंपनीने स्काडा मीटरची संकल्पना मांडली होती. शहरातील पाणीपुरवठ्याच्या पाण्याचे नियोजन आणि योग्य बिलिंग प्रणालीसाठी स्मार्ट सिटी कंपनीने स्काडा मीटर प्रणाली लागू करण्याची योजना आखली होती. तशी निविदाही काही महिन्यांपूर्वी काढण्यात आली होती. निविदेनुसार तीन टप्प्यात स्काडा मीटर बसविण्यात येणार होते. मात्र स्काडा प्रकल्पाच्या २८२ कोटींच्या निविदा प्रक्रियेत परस्पर फेरबदल करण्यात आल्याचा आरोप संचालकांनी केल्यामुळे गोंधळ निर्माण झाला होता.वॉटर आॅडिट : ७० टक्के मीटर नादुरुस्तशहरात दैनंदिन होणाऱ्या पाणीपुरवठ्यातील ४३ टक्के पाण्याचा हिशेब लागत नव्हता, त्यामुळे पाणीबिलिंगमधून पालिकेला तोटा सहन करावा लागत असल्याची बाब महापालिकेच्या वॉटर आॅडिटमध्ये समोर आली होती. या अहवालानुसार ७० टक्के मीटर हे नादुरुस्त असल्याचेही समोर आले होते. त्यामुळे पाणीपुरवठा प्रणालीचे नूतनीकरणासाठी स्काटा मीटर प्रणाली बसविण्याचा निर्णय घेण्यात आला होता.स्काडा प्रणाली अंतर्गत दोन लाख मीटर विकत घेऊन ते बसविले जाणार होते. परंतु यामध्ये परस्पर शुद्धीपत्रक काढून तीन बदल करण्यात आल्याचा आक्षेप घेत ठेकेदाराच्या भल्यासाठी बदल करण्यात आल्याचा आरोप विरोधी पक्षनेत्यांनी केला होता.संचालकांच्या तक्रारीनंतर स्मार्ट सिटी कंपनीचे अध्यक्ष सीताराम कुंटे यांनी या निविदाप्रक्रियेला स्थगिती दिली होती. त्यानंतर स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी थविल यांनी अध्यक्ष कुंटे यांच्या सूचनेवरूनच बदल केल्याचे आरोप केल्याने हे प्रकरण चर्चेत आले होते.
स्काडा मीटरसाठी पुन्हा निविदा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2019 1:00 AM
स्मार्ट सिटी अंतर्गत पाणीपुरवठा मनपाच्या विभागाचे आधुनिकीकरण करतानाच पाण्याची होणारी गळती आणि जल व्यवस्थापनाच्या नियोजनासाठी स्काडा मीटरची निविदा पुन्हा एकदा काढण्यात आली आहे. यापूर्वी या निविदेत परस्पर फेरबदल केल्याच्या संचालकांच्या आरोपावरून वादग्रस्त ठरलेली ही निविदाप्रक्रिया रद्द करण्यात आली होती. आता आचारसंहितेपूर्वी स्काडा मीटरचा मुहूर्त साधण्यात आला आहे.
ठळक मुद्देमहापालिका : आचारसंहितेपूर्वी साधला मुहूर्त