नायगाव : टेंडर निघण्यापूर्वीच सुरू झालेल्या सिन्नर तालुक्यातील सोनगिरी येथील ग्रामपंचायतीच्या कामांबाबत चौकशीच्या मागणीनंतर बंद झालेले काम पुन्हा सुरू झाल्याने ग्रामस्थांमध्ये चर्चा रंगली आहे. जनसुविधा योजनेतून मंजूर झालेल्या ५ लाख रूपयांच्या स्मशानभूमी व मूलभूत सुविधा योजनेतून मंजूर झालेल्या १५ लाख रूपयांच्या व्यायामशाळेचे काम टेंडर निघण्याआधीच सुरू झाल्याने कामाबाबत सोनगिरी परिसरात चर्चा रंगली आहे. या दोन्ही कामांची निविदा भरण्याची तारीख ६ सप्टेंबर असतानाही हे दोन्ही कामे टेंडर नोटीस वर्तमानपत्रात प्रसिद्ध होण्याआधीच सुरू झाली आहेत. ग्रामपंचायतीच्या नवीन पद्धतीमुळे उपसरपंचाबरोबर सदस्यही अवाक् झाले आहेत. सरपंचाच्या एकाधिकारशाही कारभाराबरोबर विविध योजनांमध्ये झालेल्या गैरकारभाराची चौकशी करण्याची मागणी उपसरपंचांबरोबर आम्ही सर्व सदस्यांनी केली आहे. टेंडर निघण्याआधीच सुरू झालेले काम थांबविल्याचे सांगितले जात असले तरी प्रत्यक्षात हे काम सुरूच असल्याचे दिसत आहे. सदर कारभाराची चौकशी झालीच पाहिजे.- विलास लहाणे, ग्रामपंचायत सदस्य.टेंडर निघण्याआधीच सोनगिरी येथे सुरू असलेले स्मशानभूमीचे काम.
टेंडरआधी स्मशानभूमीचे काम सुरूच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 07, 2018 12:48 AM
नायगाव : टेंडर निघण्यापूर्वीच सुरू झालेल्या सिन्नर तालुक्यातील सोनगिरी येथील ग्रामपंचायतीच्या कामांबाबत चौकशीच्या मागणीनंतर बंद झालेले काम पुन्हा सुरू झाल्याने ग्रामस्थांमध्ये चर्चा रंगली आहे. जनसुविधा योजनेतून मंजूर झालेल्या ५ लाख रूपयांच्या स्मशानभूमी व मूलभूत सुविधा योजनेतून मंजूर झालेल्या १५ लाख रूपयांच्या व्यायामशाळेचे काम टेंडर निघण्याआधीच सुरू झाल्याने कामाबाबत सोनगिरी परिसरात चर्चा रंगली आहे
ठळक मुद्देसोनगिरी येथील प्रकार : सरपंचाविरोधात सदस्यांची एकजूट