शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायली नागरिक अचानक भारत सोडून जाऊ लागले; पर्यटनाचे बुकिंग रद्द, विमाने फुल
2
"एकनाथ शिंदे दावोसमध्ये हॉटेलचं बिल न देताच..." जयंत पाटलांचा मुख्यमंत्र्यांना खोचक टोला
3
'सुप्रिया सुळेंना फुकटचं खायची सवय, १५०० दिले तर पवारांच्या...', भाजप आमदाराची टीका
4
Smart SIP Vs Regular SIP : स्मार्ट आणि रेग्युलर SIP मध्ये फरक काय, ५००० रुपयांतून २३ लाखांची होईल अधिक कमाई; कशी?
5
"सिंचन घोटाळा झाल्याचं पंतप्रधान मोदींनीच कबूल केलं"; पृथ्वीराज चव्हाणांनी अजित पवारांना पुन्हा डिवचलं
6
शाळेतून परतणाऱ्या मुलींची छेड काढणाऱ्यांचा 'हाफ एन्काऊंटर'; आरोपींचा पोलिसांवर गोळीबार
7
Suraj Chavan : १४ लाख अन् १० लाखांचा व्हाऊचर आणि..., बिग बॉस जिंकल्यानंतर सूरज चव्हाणला किती रुपये मिळाले?
8
'तो जिंकला अन् १ तासात गाणं तयार केलं', उत्कर्ष शिंदेने बनवलेलं सूरज चव्हाणवरचं धमाकेदार गाणं ऐकाच
9
अमेरिकेच्या अ‍ॅडवायझरीनंतर कराची विमानतळाबाहेर बॉम्बस्फोट; दोन परदेशी नागरिकांचा मृत्यू
10
छत्रपतींचे स्मारक कधी होणार? संभाजीराजेंचे टार्गेट भाजप; अरबी समुद्रात शिवस्मारक शोध आंदोलन
11
ओलाच्या सर्व्हिसवरून कुणाल कामरा-भाविश अग्रवाल भिडले; लोकांनी मालकाला आरसा दाखविला...
12
"शिवसेना वाढण्यासाठी हजारो शिवसैनिकांच्या हत्या"; रामदास कदमांचे वक्तव्य, म्हणाले "उद्धव ठाकरेंना याची..."
13
आजचे राशीभविष्य ७ ऑक्टोबर २०२४; धनलाभ होईल, येणारी बातमी...
14
“स्मारकाविरोधात कोर्टात जाणारे कोण तेही बघा”; देवेंद्र फडणवीसांचा संभाजीराजेंवर पलटवार
15
'त्या' सगळ्यांना पुन्हा पक्षात प्रवेश देणार: ठाकरे, शिंदेसेनेचे माजी नगरसेवक उद्धवसेनेत
16
“हिऱ्याच्या पोटी गारगोटी, मुलाशी का, बापाशी भिडा”; CM एकनाथ शिंदेंचे उद्धव ठाकरेंना आव्हान
17
“लोकसभेची गणिते वेगळी होती, मनसेबाबत महायुतीचे वरिष्ठ नेते निर्णय घेतील”: श्रीकांत शिंदे
18
मराठी अभिजात भाषा झाली तरी जल्लोष का नाही?: राज ठाकरे, पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या
19
चांगल्यांचा सन्मान अन् वाईटांना शिक्षा करीत नाही ते म्हणजे सरकार: नितीन गडकरी
20
चेंबूरमध्ये अग्नितांडव, दुकानातील रॉकेलच्या साठ्याचा भडका; एकाच कुटुंबातील ७ जणांचा मृत्यू

मुलाने चोरी केल्याचा तणाव; वडिलाने संपविली जीवनयात्रा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2019 3:54 PM

अल्पवयीन मुलाने सोन्याची बिस्किटे व दहा हजाराची रोकड चोरी करून पोबारा केल्याचे मंगळवारी उघडकीस आले. ही बाब म्हस्के यांना सहन झाली नसावी व त्यामुळे आलेल्या तणावाने त्यांनी असे पाऊल उचलले असावे, असा अंदाज त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी व्यक्त केला

ठळक मुद्देसंशयित अल्पवयीन मुलगा सध्या परभणी पोलिसांच्या ताब्यातम्हस्के यांच्या मृत्यूने कुटुंबावर मोठा आघात

नाशिक : कॉँग्रेस प्रदेश प्रवक्ता व नगरसेविका हेमलता पाटील यांच्या बंगल्यात नोकर म्हणून मागील सहा ते सात वर्षांपासून कार्यरत असलेले श्रीपत उर्फ बंडू तुकाराम म्हस्के (५२, रा.कामटवाडे वावरेनगर) यांनी विषारी औषध सेवन करून भगुर बसस्थानकावर आत्महत्त्या केल्याची घटना घडली.टिळकवाडी येथील पाटील यांच्या बंगल्यावर म्हस्के नोकरदार म्हणून मोलमजूरी करत होते. महिनाभरापुर्वी त्यांच्या धाकट्या अल्पवयीन मुलाने सोन्याची बिस्किटे व दहा हजाराची रोकड चोरी करून पोबारा केल्याचे मंगळवारी उघडकीस आले. ही बाब म्हस्के यांना सहन झाली नसावी व त्यामुळे आलेल्या तणावाने त्यांनी असे पाऊल उचलले असावे, असा अंदाज त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी व्यक्त केला आहे. म्हस्के यांच्या मृत्यूने कुटुंबावर मोठा आघात झाला असून कुटुंबाचा आधार हरपला. त्यांच्या मृतदेहावर मंगळवारी दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले. चोरीच्या गुन्ह्यात संशयित अल्पवयीन मुलगा सध्या परभणी पोलिसांच्या ताब्यात आहे.म्हस्के हे मंगळवारी भगूर बस स्थानक परिसरात अचानकपणे निघून गेले. त्यांनी तेथे विषारी औषध सेवन केल्याने कोसळल्याचे नागरिकांच्या लक्षात आले. तत्काळ नागरिकांनी भगूर पोलीस चौकीमधील कर्मचाऱ्यांच्या ही बाब निदर्शनास आणून दिली. पोलिसांनी धाव घेत त्यांच्या मोबाईलवरून नातेवाईकांशी संपर्क साधला व त्यांना देवळालीच्या छावनी रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले; मात्र त्यापुर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी तपासून घोषित केले. त्यांचे जावई अनिल गंगाधर हतांगळे यांनी त्यांची ओळख पटविली. मयत म्हस्के यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, दोन मुली, जावई, भाऊ असा परिवार आहे.

 

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयtheftचोरीGoldसोनंAccidentअपघात