आडगाव पोलिसांनी आता पर्यंत याप्रकरणी जवळपास दहा आरोपींना गजाआड करत त्यांच्याकडून सुमारे अडीच लाख रुपये किमतीचे ८५ रेमडेसिविर इंजेक्शन जप्त केले आहे. गुरुवारी पोलिसांनी नाईकला पालघर जिल्ह्यातून अटक केली. नाईक हा सिद्धेश पाटील समवेत बोईसरला औषध कंपनीत काम करायचा नाईक हा पाटील याच्या मदतीने रेमडेसिविर इंजेक्शन तसेच बाटल्यांवर असलेले लेबल
चोरून काळाबाजार करणाऱ्यांना पुरवायचा. दोन दिवसांपूर्वी पोलिसांचे पथक पालघर बोईसरला आल्याची माहिती मिळताच नाईकने त्याच्या जवळ असलेले जवळपास १८ ते २० रेमडेसिविर इंजेक्शन आणि लेबल खाडीत फेकून दिले. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने इंजेक्शन व लेबल फेकल्याची कबुली दिली. न्यायालयाने त्याला चार दिवस पोलिस कोठडी सुनावली आहे.