नाशिक : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे गुरु वारपासून (दि. १) माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (एसएससी) परीक्षेस सुरु वात होत असून, बारावीच्या परीक्षेनंतर आता शिक्षण मंडळातर्फे दहावी परीक्षेसाठी विशेष नियोजन करण्यात आले आहे. दहावीच्या परीक्षेसाठी नाशिक विभागातून यंदा दोन लाख दहा हजार ७८२ विद्यार्थी प्रविष्ट होणार असून, यात नाशिक जिल्ह्णातील ९६ हजार १९२ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. दहावीची परीक्षा सुरळीत पार पडावी तसेच परीक्षा कालावधीत संभाव्य गैरप्रकार टाळण्यासाठी शिक्षण मंडळाने विभागात २७ भरारी पथकांची नियुक्ती केली असून, त्यांची विभागातील ४३२ परीक्षा केंद्रांवर करडी नजर राहणार आहे. दहावी परीक्षेचा गुरुवारी पहिलाच दिवस असून, मराठी, हिंदी, उर्दू, गुजराथी आणि सिंधी या भाषा विषयांची परीक्षा असून, यात मराठी भाषा विषयाचा पेपर एक लाख ७६ हजार विद्यार्थी देणार आहेत. यावर्षी नाशिक विभागात ४३२ परीक्षा केंद्रांवर दहावीची परीक्षा घेण्यात येत असून, नाशिक जिल्ह्णात १९५ केंद्रांवर ९६ हजार १९२ विद्यार्थी, धुळे जिल्ह्णात ६३ परीक्षा केंद्रांवर ३० हजार २४९, जळगाव जिल्ह्णात १३१ केंद्रांवर ६३ हजार १५९ व नंदुरबार जिल्ह्णातील २१ हजार १८२ विद्यार्थ्यांची ४३ केंद्रांवर आसनव्यवस्था करण्यात आली आहे.२७ पथकांची करडी नजरनाशिक विभागात ४३२ परीक्षा केंद्रांवर घेण्यात येणाºया दहावीच्या परीक्षेत कोणताही गैरप्रकार घडू नये यासाठी विभागीय शिक्षण मंडळाने जिल्हानिहाय भरारी पथकांची नियुक्ती केली आहे. त्यानुसार नाशिक जिल्ह्णात ८, धुळे जिल्ह्णात ६, जळगावमध्ये ५ व नंदुरबारमध्ये ४ अशा २३ पथकांसह पाच विशेष पथकांची विभागातील सर्व परीक्षा केंद्रांवर करडी नजर राहणार आहे. यात जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाºयांचे विशेष भरारी पथक अचानक परीक्षा केंद्रास भेट देऊन पाहणी करेल, तर काही बैठे पथक परीक्षांवर नजर ठेवून असणार आहेत.संवेदनशील केंद्रांवर अधिक लक्षदहावी व बारावीच्या परीक्षांतील गैरप्रकारांची दखल घेत शिक्षण मंडळाने यावर्षी नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार या चार जिल्ह्णांतील २० संवेदनशील केंद्रांची यादी तयार केली असून, भरारी पथकांसोबतच काही केंद्रांवर पूर्णवेळ बैठे पथक परीक्षेवर नियंत्रण ठेवणार आहे.
आजपासून दहावीची परीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 01, 2018 2:09 AM