ओझर टाउनशिप : हिंदुस्थान एरॉनॉटिक्स लिमि.च्या नाशिक विभागासह देशभरात असलेल्या नऊ विभागांतील कामगारांनी वेतन करारासह इतर मागण्यांसाठी पुकारलेल्या संपाला दुसºया दिवशी देखील उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. विविध राजकीय नेत्यांनी संपकरी कामगारांची भेट घेऊन संपाला पाठिंबा दिला.३५०० कामगार सहभागी असलेल्या संपाला हंगामी कामगारांनीदेखील पाठिंबा देत ते संपात सहभागी झाल्याने व्यवस्थापनाच्या दैनंदिन कामावर याचा प्रभाव पडल्याचे दिसून आले.एचएएल व्यवस्थापन आणि कामगार संघटना यांच्यातील वेतनकरारवाढीसाठी एकूण ११ बैठका झाल्या त्यापैकी बंगळुरू येथे झालेली अंतिम बैठक निष्फळ ठरल्याने नियोजनानुसार पूर्वीच दिलेल्या नोटिसीप्रमाणे सोमवारपासून (दि. १४) कामगारांनी बेमुदत संपाला सुरुवात केली आहे. जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही, तोपर्यंत संप सुरूच राहील अशी ठाम भूमिका कामगार संघटनेचे अध्यक्ष भानुदास शेळके, सरचिटणीस सचिन ढोमसे व कामगार युनियननी घेतली आहे.संपाच्या दुसºया दिवशी कामगारांनी कारखान्याच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर पवन कदम, गोपाल भगत, दीपक बेंडे, नितीन पवार, विकास दुधसाखरे आदींनीक्र ांतिगीते गात व्यवस्थापनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. यावेळी एचएएल कामगार संघटनेचे अध्यक्ष भानुदास शेळके, सरचिटणीस सचिन ढोमसे यांच्यासह प्रवीण तिदमे, दीपक कदम, जितू जाधव, अनिल मंडलिक, अशोक कदम, संजय कुटे, पवन आहेर, कमलेश धिंगाणे, गिरीश वलवे, भूषण ब्यास, राहुल कोळपकर, सचिन दीक्षित, रमेश कदम, मनोज भामरे, मन्सुर शेख, नवनाथ मुसळे, संतोष आहेर, योगेश ठुबे, आनंद बोरसे, मिलिंद निकम, अशोक गावंडे आदी ३५०० कामगार उपस्थित होते.राजकीय व्यक्तींनी दिला पाठिंबागेले पाऊण शतक देशासाठी काम करणाºया भारतीय वायुसेनेचा कणा असलेल्या एचएएल कामगारांवर सरकार व व्यवस्थापन यांच्या चुकीच्या धोरणांमुळेच संपावर जाण्याची वेळ आली असल्याची टीका कामगार नेत्यांनी केली आहे. दरम्यान, संपाच्या दुसºया दिवशी अनेक राजकीय व्यक्तींनी संपकरी कामगारांची भेट घेऊन त्यांना पाठिंबा दिला.
एचएएल कामगारांचा संप दुसऱ्या दिवशीही सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2019 1:28 AM