मनमाड : देशात दहशतीचे राजकारण सुरू असून, यामध्ये बदल करायचा असेल तर सत्तापरिवर्तन आवश्यक असल्याचे प्रतिपादन वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी मनमाड येथे आयोजित प्रचार सभेत बोलताना केले. दरम्यान, नाशिक येथील सभेस उपस्थित न राहताच त्यांना मुंबईस परतावे लागले.प्रकाश आंबेडकर यांनी मनमाड येथे बोलताना सेना-भाजपसह काँग्रेस-राष्टÑवादीवरही जोरदार टीका केली. राहुल गांधी पुन्हा प्रचारात उतरले आहेत; परंतु ते स्वत:हून उतरले की मोदी यांनी त्यांना उतरवले, असा सवाल उपस्थित करत आंबेडकर म्हणाले, गेल्या पाच वर्षांत भाजपने काय केले याची चिरफाड चालू असताना राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा राफेलची जुनीच टेप वाजवायला सुरुवात केली आहे.राफेलविषयी भाजपची कोंडी करायची असेल कॉँग्रेसने मनमोहन सिंग यांना मैदानात उतरवले पाहिजे. भाजपला सत्तेवर ठेवण्याचे काम काँग्रेसच करत आहे. वातावरण भावनिक केले जात असल्याचेही ते म्हणाले. (पान ५ वर)(पान ५ वर)वंचित आघाडी सत्तेवर आली तर शेतकऱ्यांच्या शेतमालाला चांगला भाव देईल, असेही ते म्हणाले. या वेळी वंचितचे प्रदेश महासचिव नवनाथ पडळकर, जिल्हाध्यक्ष भारत म्हस्के, गणपत भिसे यांनीही मनोगत व्यक्त केले.
देशात दहशतीचे राजकारण : प्रकाश आंबेडकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2019 2:12 AM
देशात दहशतीचे राजकारण सुरू असून, यामध्ये बदल करायचा असेल तर सत्तापरिवर्तन आवश्यक असल्याचे प्रतिपादन वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी मनमाड येथे आयोजित प्रचार सभेत बोलताना केले. दरम्यान, नाशिक येथील सभेस उपस्थित न राहताच त्यांना मुंबईस परतावे लागले.
ठळक मुद्देमनमाडला वंचित बहुजन आघाडीची सभा