शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

धोकादायक इमारतींचे होणार संरचना परीक्षण

By admin | Published: June 18, 2016 10:54 PM

२५० इमारतींना नोटिसा : बांधकाम सुस्थिती प्रमाणपत्र अनिवार्य

नाशिक : महापालिकेने शहरातील ३० वर्षे किंवा त्याहून अधिक कालावधी झालेल्या धोकादायक इमारतींचे संरचना परीक्षण (स्ट्रक्चरल आॅडिट) करणे अनिवार्य केले असून, त्यासाठी सुमारे २५० इमारतींना नोटिसा बजावल्या आहेत. संबंधित इमारतमालकांना नगररचना विभागाकडे संरचना अभियंत्यामार्फत बांधकाम सुस्थिती प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक केले आहे. महापालिकेमार्फत दरवर्षी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील धोकादायक इमारती-वाडे यांना नोटिसा बजावल्या जातात. परंतु, या नोटिसांना कुणीही इमारत मालक अथवा भाडेकरू गांभीर्याने घेत नाहीत. मनपाच्या विभागीय कार्यालयामार्फतही केवळ कागदोपत्री कारवाईचा खेळ मांडला जातो. प्रत्यक्षात कुठेही कारवाई होताना दिसून येत नाही. वास्तविक ज्या इमारतींना भोगवटा प्रमाणपत्र प्राप्त केल्यापासून ३० वर्षे किंवा त्याहून अधिक कालावधी झाला असेल अशा इमारती वास्तव्य करण्यायोग्य आहेत किंवा नाही हे संरचना अभियंत्यामार्फत प्रमाणित करून घेणे अनिवार्य आहे. महापालिकेच्या नगररचना विभागाने यापूर्वी सन २०१३ मध्ये धोकादायक इमारतींना संरचना परीक्षण करून घेण्याबाबत सूचित केले होते, परंतु त्याची परिणामकारकपणे अंमलबजावणी झालेली नव्हती. आता महापालिकेने पुन्हा एकदा धोकादायक इमारतींचे संरचना परीक्षण करण्याचे ठरविले असून, त्यासाठी शहरातील सुमारे २५० धोकादायक इमारती-वाडे यांना बांधकाम सुस्थिती प्रमाणपत्रासाठी नोटिसा बजावल्या आहेत.