नाशिक : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेण्यात येणारी महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) यावर्षी १९ जानेवारीला होणार असून, या परीक्षेसाठी अर्ज केलेल्या उमेदवाराचे प्रवेशपत्र आॅनलाइन उपलब्ध करून देण्यात आले आहे. प्रवेशपत्र प्राप्त न झाल्यास अर्ज सादर केल्याच्या तसेच निश्चित कालावधीत परीक्षाशुल्क भरल्याबाबतच्या आवश्यक पुराव्यांसह परीक्षा परिषदेच्या कार्यालयात संपर्क साधण्याचे आवाहनही करण्यात आहे. पहिली ते पाचवी आणि सहावी ते आठवीच्या सर्व व्यवस्थापन, सर्व परीक्षा मंडळे, सर्व माध्यमे, अनुदानित किंवा विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित इत्यादी शाळांमध्ये शिक्षणसेवक किंवा शिक्षकपदावर नियुक्तीसाठी शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) उत्तीर्ण होणे शिक्षकांना अनिवार्य आहे.पहिली ते पाचवी आणि सहावी ते आठवीसाठीच्या शिक्षकपदासाठी १९ जानेवारीला घेण्यात येणाऱ्या टीईटी परीक्षेसाठी उमेदवारांना २१ डिसेंबर २०१९ पासून प्रवेशपत्र आॅनलाइन उपलब्ध करून देण्यात आले आहे. उमेदवारांना या प्रवेशपत्राची प्रिंट काढून घेता येणार आहे. या परीक्षेचा पहिला पेपर १९ जानेवारीला सकाळी १०.३० ते दुपारी १, तर दुसरा पेपर दुपारी २ ते ४.३० या वेळेत होणार आहे.
शिक्षकांपुढे पुन्हा एकदा ‘टीईटी’ची परीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2020 1:11 AM
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेण्यात येणारी महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) यावर्षी १९ जानेवारीला होणार असून, या परीक्षेसाठी अर्ज केलेल्या उमेदवाराचे प्रवेशपत्र आॅनलाइन उपलब्ध करून देण्यात आले आहे.
ठळक मुद्देनियोजन : संकेतस्थळावरून प्रवेशपत्र