नाशिक : पुढील वर्षी जुलै महिन्यात मुदत संपणाºया राज्य विधान परिषदेच्या नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी नवीन मतदार यादी तयार करण्याच्या कामास केंद्रीय निवडणूक आयोगाने सुरुवात केली असली तरी, दहा दिवस उलटूनही अद्याप नाशिक जिल्ह्यात एकाही शिक्षकाने मतदार नोंदणी केली नाही. शाळा, महाविद्यालयांना पुढच्या आठवड्यापासून सलग पंधरा दिवस दिवाळी सणाच्या सुट्या लागणार असून, तोपर्यंत मतदार नोंदणीची मुदतही संपुष्टात येणार असल्यामुळे मतदार नोंदणी झालीच नाही तर पुढे काय असा प्रश्न उभा राहणार आहे.नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाच्या विद्यमान सदस्याची मुदत जुलै महिन्यात संपुष्टात येत असल्यामुळे तत्पूर्वीच विधान परिषदेच्या या एका जागेसाठी निवडणूक आयोगाला निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करावा लागणार आहे. दर सहा महिन्यांनी होणाºया या निवडणुकीसाठी प्रत्येक वेळी नवीन मतदार यादी तयार करावी लागते, म्हणजेच गेल्या निवडणुकीत वापरलेली मतदार यादी सहा वर्षांनंतर रद्द ठरविण्यात येते व शिक्षकांना नवीन मतदार नोंदणी करावी लागते. त्यासाठी लागणारा कालावधी पाहता आयोगाने २८ सप्टेंबरपासून मतदार नोंदणीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. २५ आॅक्टोबरपर्यंत शिक्षक मतदार म्हणून आपली नोंदणी करू शकतील, असे आयोगाने जाहीर केले असून, ६ नोव्हेंबरपर्यंत दावे व हरकती स्वीकारल्या जाणार आहे. आयोगाने कार्यक्रम जाहीर करून दहा दिवसांचा कालावधी उलटला तरी जिल्ह्यात एकही मतदाराची नोंदणी करण्यात आलेली नाही.
मतदार नोंदणीकडे शिक्षकांची पाठ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2017 5:13 PM
नाशिक : पुढील वर्षी जुलै महिन्यात मुदत संपणाºया राज्य विधान परिषदेच्या नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी नवीन मतदार यादी तयार करण्याच्या कामास केंद्रीय निवडणूक आयोगाने सुरुवात केली असली तरी, दहा दिवस उलटूनही अद्याप नाशिक जिल्ह्यात एकाही शिक्षकाने मतदार नोंदणी केली नाही. शाळा, महाविद्यालयांना पुढच्या आठवड्यापासून सलग पंधरा दिवस दिवाळी सणाच्या ...
ठळक मुद्दे दहा दिवस उलटले : सुट्यांमुळे मुदतवाढीची शक्यता