घोटी : वाडीवºहे गोंदे औद्योगिक वसाहतीतील थायसनकृप इलेक्ट्रिक स्टील कंपनीत कामगार उत्कर्ष सभा या कामगार संघटनेत व कंपनी व्यवस्थापनात पगारवाढीचा करार झाल्याने सुरू असलेला संप मागे घेण्यात आला.पगारवाढीचा करार व अन्य मागण्यांसाठी थायसनकृप कंपनीचे कामगार गेल्या ६ दिवसांपासून संपावर होते. कामगार उत्कर्ष सभेचे अध्यक्ष जितूभाई जोशी, स्थानिक कामगार प्रतिनिधी राजाराम बस्ते, विलास पाटील, सोमनाथ कातोरे, अनिल देवरे व व्यवस्थापनाकडून के. व्यंकटेशन ,जयदीप भट्टाचार्य, अविनाश गांधी, सिद्धिविनायक देशपांडे यांच्यात बैठक झाली. यात २०१८ ते २१ साठी रुपये ८५०० + महागाई भत्त्याचा वेतन करार करण्यात आला.२०१८-१९ वर्षासाठी ५०%, २०१९-२० वर्षासाठी ४०%, २०२०-२१ वर्षासाठी १०% याप्रमाणे वेतनवाढ करार करण्यात आला. या शिवाय ७८०० मेडिक्लेममध्ये वाढ करण्यात येणार आहे. मृत्युफंडात कामगाराचा कंपनीत कामावर असल्यास मृत्यू झाल्यास १६ लाख रुपये व कंपनीच्या बाहेर मृत्यू झाल्यास १० लाख रुपये एवढी वाढ झाली. कर्मचारी व कामगारांच्या पगारातून १००० रुपये प्रत्येकी कपात करून त्यांच्या वारसदारांना ही रक्कम देण्यात येईल.कंपनी तात्पुरत्या २४ कामगारांना कंपनीत गरज असेल त्या प्रमाणात टप्प्याटप्प्याने कायम करण्यात येईल. तसेच त्यांच्या वेतनात वाढ करण्यात येणार आहे.संपाच्या समारोपवेळी संपकरी कामगारांना कंपनीचे एम.डी. के. व्यंकटेशन यांनी कंपनीच्या परिस्थितीविषयी माहिती सांगितली. त्यांच्यासमवेत सर्व संचालक, व्यवस्थापकीय अधिकारी हजर होते.
थायसनकृप कामगारांचा संप मागे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2019 12:45 AM